Maharashtrawadi Gomantak Party: डिचोलीचे माजी आमदार नरेश सावळ यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्षाच्या कार्यकारी समिती अध्यक्षपदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याची महत्वाची बातमी समोर येतेय.
त्याच सोबत सावळ हे येणारी लोकसभा निवडणुक लढवणार असल्याची माहिती मिळतेय. सावळ यांनी आपला राजीनामा गुरुवारी पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्याकडे दिलाय.
या राजीनाम्यात त्यांनी पक्ष सोडण्याची कारणं लिहिली आहेत. पक्षाची संघटना तळागाळापर्यंत लोकांची कामे करण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे लोकांचा मगो पक्षावरील विश्वास आणि आशा उडाली आहे.
ढवळीकरांसारखे मगोपक्षाचे तथाकथित नेते ग्रामीण भागातील जनतेवर लक्ष देत नाहीत. डिचोली आणि उत्तर गोव्यातील लोकांच्या मागण्या आणि कामे पूर्ण करण्यात पक्ष अपयशी ठरला असल्याचे आरोप त्यांनी केले आहेत.
पक्षातून बाहेर पडताना सावळ यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा माझा विचार असल्याचेही सांगितले आहे. मात्र कोणत्या पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवणार हे अद्याप ठरलेले नसून याबाबत आपण समर्थकांचा सल्ला घेणार असल्याचे नरेश सावळ यांनी सांगितले आहे.
सावळ यांनी राजकीय कारकिर्दीची सुरवातच बंडखोरीने केली होती. त्यांना उमेदवारी नाकारल्यावर ते डिचोली मतदारसंघातून अपक्ष लढले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.