Goa News | Shri Swami Samarth Dainik Gomantak
गोवा

Goa News: शिवोली मठात स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त कार्यक्रम

Goa News: 8.30 वा. स्वामींच्या भक्तिगीतांवर आधारित नृत्यांचे सादरीकरण होणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa News: येथील श्री स्वामी समर्थ मठात 7 ते 9 नोव्हेंबरपर्यंत स्वामी समर्थ प्रकटदिन विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ‘कलर्स’ या टीव्ही चॅनलवरील जय जय श्री स्वामी समर्थ मालिकेमध्ये स्वामींची भूमिका साकारणारे अभिनेते अक्षय मुदवाडकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती मठाचे संस्थापक नीलेश वेर्णेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

7 आणि 8 रोजी सकाळी आठ वाजल्यापासून चोपडे-आगरवाडा, मोरजी, मांद्रे, हरमल, केरी, पालये, कोरगाव, तुये तसेच पार्से आणि 9 नोव्हेंबरला कामुर्ली तसेच शिवोली, सडये आणि ओशेल मिळून शिवोली पंचक्रोशीत समर्थांची सवाद्य पालखी मिरवणूक निघणार आहे.

तसेच शिवोली येथील मठात सकाळी 9 वाजल्यापासून स्वामींची पूजा-अर्चा, दुपारी आरती, तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 8.30 वा. स्वामींच्या भक्तिगीतांवर आधारित नृत्यांचे सादरीकरण होणार आहेत. नंतर 9 वाजता मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. यावेळी अभिनेते अक्षय मुदवाडकर उपस्थित राहाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT