Siolim bridge Dainik Gomantak
गोवा

Goa Morjim News: चोपडे-शिवोली पुलाच्या विद्रुपीकरणाचा प्रकार

Goa Morjim News: स्थानिकांत नाराजी ः सरकारने संबंधितावर कारवाई करण्याची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Morjim News: चोपडे-शिवोली पूल हा बार्देश आणि पेडणे तालुक्याचा दुवा ठरत आहे. या पुलामुळे दोन तालुक्यातील जनतेचे ऋणानुबंध वाढलेले आहेत. पूर्वी फेरीबोट असताना प्रवाशांना बऱ्याच प्रकारचा त्रास होत होता.

परंतु त्या काळानंतर सरकारने या पुलाची उभारणी केली. परंतु सध्या या पुलाच्या दोन्ही बाजूच्या संरक्षण कठड्याचे विद्रूपीकरण होत असलेले दिसते. संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.

पुलाच्या खांबांचेही विद्रूपीकरण करण्याचा प्रकार काही विदेशी पर्यटकांनी केलेला आहे. सर्व त्याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. वेगवेगळ्या प्रकारातून चित्र रंगवून वापर चित्रे काढलेले आहेत. वेगवेगळ्या भाषेमधून काहीतरी लिहून पूर्णपणे हे कठडे विद्रूप केलेले दिसून येतात.

सार्वजनिक मालमत्तेची हानी करणे कायद्याने गुन्हा आहे. आणि या प्रकारावर आजपर्यंत कोणावरच का कारवाई केली नाही? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संजय कोले यांनी उपस्थित केला.

केवळ पुलाच्या संरक्षण भिंतीचे विद्रूपीकरण नव्हे. तर ठिकठिकाणी विजेचे खांब असतील. फलक असतील विजेचे नवीन भूमिगत केबल द्वारे ट्रान्सफॉर्मर बसवलेले आहेत ,ते ट्रान्सफॉर्मर देखील विद्रूप करण्याचे काम पर्यटकांकडून होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

या पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात विद्रुपीकरण केले गेले आहे. या विदेशी पर्यटकांवर का कारवाई होत नाही?

या पुलाच्या दोन्ही बाजूला सीसीटीव्ही बसवून जे कोण असे प्रकार करतात त्यांच्यावर कडक कारवाई करावी. विदेशी आणि देशी पर्यटकांचे आम्ही स्वागत करतो,परंतु असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही.

-संजय कोले, स्थानिक रहिवाशी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT