Goa Short Film Festival Dainik Gomantak
गोवा

Goa Short Film Festival: गोवा लघुपट महोत्सवात ‘जिजीविशा’ सर्वोत्कृष्ट; 'मुझको भी लिफ्ट करा दे' सर्वोत्कृष्ट गोमंतकीय लघुपट

Goa Short Film Festival 2024: अकराव्या गोवा लघुपट महोत्सवात अभिषेक लोकनार दिग्दर्शित जिजीविशा हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला. पीपल या लघुपटासाठी गणेश चौगुले यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले.

गोमन्तक डिजिटल टीम

11th Goa Short Film Festival

पणजी: अकराव्या गोवा लघुपट महोत्सवात अभिषेक लोकनार दिग्दर्शित जिजीविशा हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला. पीपल या लघुपटासाठी गणेश चौगुले यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. गमन या लघुपटाला सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. मुझको भी लिफ्ट करा दे हा लघुपट सर्वोत्कृष्ट गोयंकर लघुपट ठरला. प्रारब्ध या लघुकथासाठी जय अमोणकर यांना सर्वोत्कृष्ट गोयंकर दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. मर्डर या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट गोयंकर लेखनाचे पारितोषिक देण्यात आले.

चित्रपट परिवार संस्थेतर्फे पाटो,पणजी येथील संस्कृती भवन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या गोवा लघुपट महोत्सवाचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ कवी तथा लेखक जॉन अागियार, प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते गोपीनाथ चांडेलकर आणि ज्येष्ठ कवी नारायण खोर्जुवेकर यांच्या हस्ते पार पडले. महोत्सवाचे संचालक योगेश बारस्कर यावेळी उपस्थित होते. या लघुपट महोत्सवात भारतासह विविध देशातील शंभरहून अधिक लघुपट दाखवण्यात आले.

जास्वंद सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट

गुड मॉर्निंग हा लघुपट सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपट ठरला. पापा अँड स्मार्टफोन या लघुपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे तर झटका या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट भारतीय लेखनाचे पारितोषिक देण्यात आले. जास्वंद हा सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट ठरला. ओसीडी या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट मराठी दिग्दर्शनाचे पारितोषिक देण्यात आले. परपलिक्सिंग या लघुपटाला सर्वोत्कृष्ट मराठी पटकथा लेखन या पुरस्काराने गौरविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Court Verdict: जिल्हा न्यायालयाचा निर्णय हायकोर्टाने बदलला; खून प्रकरणात 10 वर्षे शिक्षा झालेल्या आरोपीची सुटका

France Violence: नेपाळनंतर फ्रान्समध्ये 'अराजक'! नवा पंतप्रधान निवडताच उसळला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोड सुरु; 200 आंदोलकांना अटक VIDEO

"माझे आजोबा पंतप्रधान...", प्रसिद्ध हिंदी अभिनेत्रीची Post Viral; नेपाळच्या राजकारणाशी नेमका संबंध काय?

Goa Assembly Speaker Election: सभापतीपदाच्या खूर्चीवर कोण बसणार? विरोधी पक्षाकडून एल्टन डिकॉस्ता मैदानात; सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात

Goa Cabinet: दिवाडीतील सप्तकोटेश्वर मंदिराचा चेहरामोहरा बदलणार; 'कोटी तीर्थ कॉरिडॉर'ला मंत्रिमंडळाची मंजुरी

SCROLL FOR NEXT