Goa Shipyard Limited Dainik Gomantak
गोवा

Goa Shipyard Limited: गोवा शिपयार्डची ‘मरिट्रॉनिक्स इंडिया’शी हातमिळवणी

जीएसएलने ‘एमआयपीएल’शी भागीदारी केली आहे. यामुळे देशाच्या क्षमतेत वृध्दी होणार आहे- उपाध्याय

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Shipyard Limited गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) यांनी सागरी क्षेत्रात संशोधन आणि विकास उपक्रम प्रयत्नांना मजबुती देण्यासाठी मरिट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ‘एमआयपीएल’ या कंपनीशी हातमिळवणी केली आहे.

तसेच उभय कंपन्यांनी दक्षिण आशियातील सर्वात प्रमुख सागरी प्रदर्शन असलेल्या इनमेक्स एसएमएम इंडिया या प्रदर्शनात एज ब्रँड उत्पादने सादर केली आहेत.

या उत्पादन सादरीकरण समारंभावेळी भारतीय तटरक्षक दलाचे महानिरीक्षक एच. के. शर्मा, गोवा शिपयार्ड लिमिटेडचे चेअरमन तथा एमडी ब्रजेश कुमार उपाध्याय व तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक सुधीर साहनी उपस्थित होते.

इनमेक्स एसएमएम इंडिया या प्रदर्शनात ‘जीएसएल’ आणि ‘एमआयपीएल’ यांनी रडार, फोग आणि ‘इसीडीआयएस’ यासह स्वदेशी बनावटीचे डिझाईन्स असलेली एज उत्पादने प्रदर्शित केली आहेत.

विशेष म्हणजे ‘एज रडार’ हे मॅग्नेट्रॉन आधारीत स्कॅनर असलेले उपकरण आहे. तर ‘एज फोग’ हे उपकरण अत्यंत अचूक व देखभालीची गरज नसलेले मरीन फायबर ऑप्टिक गायरोकम्पास उपकरण आहे.

ब्रजेश कुमार उपाध्याय म्हणाले की, जीएसएलने ‘एमआयपीएल’शी भागीदारी केली आहे. यामुळे देशाच्या क्षमतेत वृध्दी होणार आहे. मरिट्रॉनिक्स इंडिया यांचे संचालक व्यंकटेशन एन. म्हणाले की, एज ब्रँडद्वारा भारतातून निर्यात वाढविण्यावर भर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT