Atal patrol vessel goa shipyard Dainik Gomantak
गोवा

Atal Patrol Ship: खोल समुद्रात स्वदेशी 'अटल' घालणार गस्त! गोवा शिपयार्डतर्फे 6वे द्रुतगती जहाज; आणखी 12 जहाजांचे जलावतरण होणार

Goa Shipyard Atal Ship: गोवा शिपयार्ड लिमिटेडने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेल्या अटल या द्रुतगती गस्ती जहाजाचे जलावतरण एका शानदार सोहळ्यात शिल्पा अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

Sameer Panditrao

वास्को: गोवा शिपयार्ड लिमिटेडने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेल्या अटल या द्रुतगती गस्ती जहाजाचे जलावतरण एका शानदार सोहळ्यात शिल्पा अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

गोवा शिपयार्डतर्फे भारतीय तटरक्षक दलासाठी बांधण्यात येणाऱ्या आठ द्रुतगती गस्ती जहाजाच्या मालिकेतील अटल हे सहावे जहाज आहे. ही सर्व जहाजे अत्याधुनिक स्वदेशी डिझाईनची आहेत.

गोवा शिपयार्डमध्ये आयोजित सोहळ्याला भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्यालयातील प्रिन्सिपल इंटिग्रेटेड फायनान्शिअल अॅडव्हायझर रोझी अग्रवाल हे प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित होते.

रोझी अग्रवाल यांच्या पत्नी शिल्पा अग्रवाल, गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय, भारतीय तटरक्षक दलाचे महानिरीक्षक सुधीर साहनी, गोवा मुख्यालयाचे मनोज भाटिया व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी उपाध्याय यांनी गोवा शिपयार्डच्या प्रगतीचा आढावा घेतला. गेल्या बारा महिन्यात गोवा शिपयार्डाने विविध अशा दहा जहाजांचे जलावतरण केले आहेत. याचा अर्थ ३७ ते ४० दिवसांमध्ये एका जहाजाचे जलावतरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या आर्थिक वर्षापर्यंत आणखी बारा जहाजांचे जलावतरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अटल या द्रुतगती गस्ती जहाजाचे जलावतरण हा स्वावलंबी प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे जहाज आव्हान, स्वदेशीकरण, नावीन्य व जहाज बांधणीतील उत्कृष्टता यांचा संगम असल्याची त्यांनी सांगितले.

शिपयार्डच्या कामगिरीचे कौतुक

रोझी अग्रवाल यांनी गोवा शिपयार्डच्या कामगिरीचे कौतुक केले. देशाच्या सागरी सुरक्षेला चालना देण्यासाठी गोवा शिपयार्डच्या भूमिकेचेही त्यांनी कौतुक केले. या जहाजाची लांबी ५२ मीटर असून ८ मीटर बीम व वजन ३२० टन आहे. हे जहाज सुरक्षा मोहिमा, खोल समुद्रातील मालमत्ता संरक्षण करण्यासाठी अतिशय सुसज्ज आहे. ज्याचा लाभ भारताच्या सागरी क्षेत्र व राष्ट्रीय सुरक्षेसाठी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: BBL सामन्यात खळबळ! पर्थ स्कॉर्चर्स आणि सिडनी सिक्सर्सच्या मॅचदरम्यान स्टेडियमला आग; थरारक व्हिडिओ व्हायरल

Dhave: सफर गोव्याची! पणजीतून पहिली कदंबा ज्या गावी आली, सत्तरीतला पहिला मुक्तीसंग्रह जिथे सुरु झाला असे स्वातंत्र्यसैनिकांचे 'धावे' गाव

UAE President India Visit: दोन तासांचा 'सस्पेन्स' दौरा! युएई अध्यक्षांची अचानक भारत भेट; मोठ्या निर्णयाची शक्यता? VIDEO

Goa Noise Pollution: गोव्यात ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांची खैर नाही! 36 जणांवर कारवाई करत 20 लाखांचा दंड वसूल; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कडक इंगा

Navpancham Rajyoga: राजयोगांचा राजा 'नवपंचम योग'! 30 वर्षांनंतर नशीब चमकवणार शनी-बुध; 'या' राशींना मिळणार कुबेराचा खजिना

SCROLL FOR NEXT