Goa Shipyard Ltd| Triput DIP Goa
गोवा

Goa Shipyard: भारतीय नौदलाची ताकद वाढणार! रशियाच्या सहकार्याने बांधलेल्या त्रिपूट युद्धनौकेचे वास्कोत अनावरण

Indian Navy: भारतीय नौदल अदम्य धैर्य, दृढनिश्चय आणि हल्ला करण्याची क्षमता यांचे प्रतिक असल्यामुळे या जहाजाला त्रिपुटा असे नाव देण्यात आले आहे

Pramod Yadav

गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL), वास्को यांच्या वतीने मंगळवारी भारतीय नौदलासाठी बांधण्यात येत असलेल्या दोन युद्धनौकांपैकी पहिली P11356 फ्रीगेट लाँच केली. ही युद्धनौका आधुनिक शस्त्रांनी सज्ज असून नौदलाची ताकद वाढवणार आहे.

गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन यांनी युद्धनौकेचे अनावरण केले. यावेळी त्यांच्या पत्नी रिटा पिल्लई देखील उपस्थित होत्या. या युद्धनौकेला 'त्रिपूट' असे नवा देण्यात आले आहे.

यावेळी व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन, नौदल उपप्रमुख, व्हाईस ॲडमिरल संजय सिंग, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, वेस्टर्न कमांड, व्हाईस ॲडमिरल बी शिवकुमार, युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण नियंत्रक, भारतीय नौदल आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

'आपले नौदल कोणत्याही देशाच्या आव्हानांचा सामना करण्यास आणि आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास सक्षम आहे', असे युद्धनौकेचे अनावरण करताना राज्यपाल पिल्लई म्हणाले.

'सतत बदलणाऱ्या भू-राजकीय परिस्थितीत राष्ट्रांसमोर अनेक आव्हाने आहेत. भारत शांतता, स्थिरता, अखंडता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे', असेही पिल्लई यांनी नमूद केले.

'भारताची विशाल किनारपट्टी हिंद महासागरापर्यंत पसरलेली आहे. भारतीय नौदल हिंद महासागर क्षेत्रात महत्त्वपूर्ण शक्ती म्हणून उदयास येत आहे, त्यामुळे भारतीय नौदलाचे आधुनिकीकरण आणि सर्वोत्तम प्लॅटफॉर्म, शस्त्रे आणि सेन्सर्सने सुसज्ज असणे नेहमीच महत्त्वाचे असते.'

'भारतीय नौदल अदम्य धैर्य, दृढनिश्चय आणि हल्ला करण्याची क्षमता यांचे प्रतिक असल्यामुळे या जहाजाला त्रिपुटा असे नाव देण्यात आले आहे', असे व्हाईस ॲडमिरल स्वामीनाथन म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT