sand mining  Dainik Gomantak
गोवा

Sand Mining: गोव्यातील शापोरा नदीतून रेतीउपसा व्‍यवसाय लवकरच सुरु होणार

Sand Mining: परवान्यासाठी अर्ज या आठवड्यात मागविण्यात येणार असून, त्यामुळे बंद असलेला रेतीउपसा व्‍यवसाय सुरु होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Sand Mining: शापोरा नदीतून पारंपरिक पद्धतीने रेतीउपसा करण्‍यासाठी पर्यावरणीय परवाने मिळालेले आहेत. त्‍यामुळे या आठवड्यात रेतीउपशासाठी अर्ज मागविण्यात येतील, अशी माहिती माहिती खाण आणि भूगर्भशास्त्र खात्याचे संचालक डॉ. सुरेश शानबाग यांनी दिली.

दरम्यान, जैवविविधता मंडळाकडून शापोरा नदीतून रेती काढण्‍यासाठी पर्यावरणीय परवाने प्राप्त झाले असून याबाबतची अंतिम अधिसूचना 2 डिसेंबर रोजी काढण्‍यात आली आहे. रेतीउपसाधारकांकडून परवान्यासाठी अर्ज या आठवड्यात मागविण्यात येतील. त्यामुळे अनेक वर्षांपासून बंद असलेला रेतीउपसा व्‍यवसाय सुरू होईल, असे शानबाग म्‍हणाले.

दुसरीकडे झुवारी आणि मांडवी नदीसाठी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या वतीने केलेल्या विविध सर्व्हेक्षणांचे अहवाल खात्याला प्राप्त झाले आहेत. हे दोन्ही अहवाल खात्याच्या वेबसाईटवर लोड करण्यात आलेले आहेत.

झुवारी आणि मांडवी नदीचे सर्व्हेक्षण

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने झुवारी नदीचे दोन प्रकारे सर्व्हेक्षण केलेले आहे. बोरी पूल, राशोल, शिरोडा, चांदर, पंचवाडी, कुडचडे येथे 84 लाख 91 हजार 90 क्युबिक मीटर आणि 13 लाख 25 हजार 744 टन वाळू उपलब्ध आहे असे अहवालात म्हटले आहे. तर, मांडवी नदीत खांडेपार, कोठंबी, वळवई, नार्वे, पिळगाव, बेतकी, आमोणा येथे 5 लाख 89 हजार 838 क्युबिक मीटर वाळू आहे, असेही अहवालात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

VIDEO: "चिदंबरम यांच्या काळात 5000 निष्पाप मारले गेले!"; 'दिमागी नक्षल' मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल, सुधांशु त्रिवेदींनी घेतलं फैलावर

Modi Government: मोदी सरकारसाठी पुढचे तीन महिने कसोटीचे; विरोधकांचे ‘नॅरेटिव्ह’ उलटवण्याचे आव्हान

Catch Of The Year! शुभमन गिलचा भन्नाट कॅच; हवेत उडी घेतली अन्... Video होतोय व्हायरल...

SCROLL FOR NEXT