पणजी: एका आमदाराचा मॉर्फ केलेला आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांतील तक्रारीनंतरही समाजमाध्यमांत व्हायरल झाल्याने उत्तर गोव्यात खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे संशयित पोलिसांच्या ताब्यात असताना ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मॉर्फ केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून बदनामी करण्याची धमकी देत लाखो रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तक्रार आमदाराने गुन्हा शाखेकडे केली होती. त्या आमदाराचे नाव गुन्हे शाखेने जाहीर केलेले नाही. तक्रारीनंतरही तो व्हिडिओच व्हायरल झाल्याने उत्तर गोव्यात मोठी खळबळ उडाली आहे.
आमदाराचा एका महिलेबरोबर मॉर्फ केलेला अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून बदनामी करण्याची धमकी देत एकाने विद्यमान आमदाराकडे ५ कोटींची खंडणी मागितली होती. संबंधित आमदाराच्या तक्रारीनुसार गुन्हा शाखेने याप्रकरणी कुकेश राऊता (२५, रा. ओडिशा) याला अटक केली आहे.
संशयित कुकेशने ५ डिसेंबर २०२३ पूर्वी आपल्याला व्हिडिओ कॉल करून संपर्क केला. आपला व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून घेतला. त्यानंतर त्याने एका महिलेबरोबर मॉर्फ करून अश्लील व्हिडिओ तयार केला. तो मॉर्फ व्हिडिओ माझ्या मोबाईल वर पाठवून सोशल मीडियावर अपलोड करून बदनाम करण्याची धमकी कुकेशने आमदाराला दिली होती. संशयिताने आपणाकडे ५ कोटींची खंडणी मागितली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.