Sessions Court |Goa News
Sessions Court |Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa Session Court : कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील त्या कैद्यांचा आरोग्य अहवाल सादर करा; उच्च न्यायालयाचा निर्देश

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Session Court : कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील जखमी कैद्यांची तपासणी करून आरोग्य अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने कारागृह प्रशासनाला दिले आहेत. समीर शेख याच्यासह सहा कैद्यांनी तुरुंग अधिकाऱ्याकडून दादागिरी केल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, यावर हा न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.

राज्याचे एजी देविदास पांगम यांनी या सर्व कैद्यांची आरोग्य तपासणी करून तो अहवाल उद्या न्यायालयात सादर केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. ही आरोग्य चाचणी कारागृहात केली जाईल आणि आवश्यकता भासल्यास या चाचणीसाठी कारागृहाबाहेर नेले जाईल, असेही ते म्हणाले.

३० मे रोजी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले विजय कारबोटकर आणि टारझन पार्सेकर यांच्यात झालेल्या मारामारीनंतर तुरुंग अधिकाऱ्यांकडून दादागिरी आणि गैरवर्तन केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. समीर शेख, कुर्बान शेख, इस्माईल मुल्ला, सादिक बेल्लारी, मुस्ताफा शेख आणि मोहम्मद शरीफ शेख यांनी ही याचिका केली आहे.

राज्य सरकार, गृहसचिव, पोलीस महासंचालक, तुरुंग महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई आणि कारागृह अधीक्षकांना या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आले आहे. आरोपींच्या संदर्भात आम्ही प्रतिज्ञापत्र दाखल करू आणि उच्च न्यायालयाला या घटनेचा तपशीलवार स्पष्टीकरण देऊ, असे ॲड.पांगम यांनी सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ जून रोजी ठेवण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

Goa Red Alert: गोव्यात आज 'रेड' तर उद्या 'ऑरेंज अलर्ट', 2-3 तासात मुसळधार पाऊस; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT