Goa Red Alert: गोव्यात आज 'रेड' तर उद्या 'ऑरेंज अलर्ट', 2-3 तासात मुसळधार पाऊस; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Goa Rain Updates: राज्यातील दोन्ही जिल्ह्यात (उत्तर आणि दक्षिण) वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Goa Red Alert: गोव्यात आज 'रेड' तर उद्या 'ऑरेंज अलर्ट', 2-3 तासात मुसळधार पाऊस; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Goa Rain UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात आज (सोमवार, दि. 8 जुलै) हवामान खात्याने 'रेड अलर्ट' वर्तवला आहे. राज्यातील दोन्ही जिल्ह्यात (उत्तर आणि दक्षिण) वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर उद्या (9 जुलै) 'ऑरेंज अलर्ट' वर्तवण्यात आला आहे. राज्यात सध्या पावासाने हाहाकार माजवला आहे. अतिवृष्‍टीमुळे मोठी हानी झाली आहे.

दरम्यान, हवामान खात्‍याने आज सकाळी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला होता, परंतु आता 'रेड अलर्ट' वर्तवण्यात आला आहे. येत्या 2-3 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना (Citizens) सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे, दक्षिणेत केपे-कुशावती नदीने पातळी ओलांडली असून, उत्तरेत डिचोलीतील काही भागांत अद्याप पाणी कायम आहे.

Goa Red Alert: गोव्यात आज 'रेड' तर उद्या 'ऑरेंज अलर्ट', 2-3 तासात मुसळधार पाऊस; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Goa Red AlertDainik Gomantak
Goa Red Alert: गोव्यात आज 'रेड' तर उद्या 'ऑरेंज अलर्ट', 2-3 तासात मुसळधार पाऊस; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Red Alert In Goa: गोव्यात रेड अलर्ट; पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा

प्रियोळात रस्ता बंद

फोंडा (Ponda) - पणजी महामार्गावरील कोने - प्रियोळ येथे सकाळी दहाच्या सुमारास दरड कोसळली. मातीसह झाडे रस्त्यावर कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. त्यानंतर वाहतूक म्हार्दोळ-फर्मागुढी रस्त्याने तसेच प्रियोळ-फर्मागुढी रस्त्याने वळवण्यात आली. रस्त्यावर पडलेली माती आणि झाडे हटवण्यासाठी अग्निशामक दल तसेच पोलिस व इतर यंत्रणेसह नागरिकांनीही सहकार्य केले. दरम्यान, बेतोडा तिठ्यावर नवीनच बांधलेली संरक्षक भिंत कोसळली. या ठिकाणी दरड कोसळल्याने ही भिंत कोसळली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com