Mahanand Naik Goa Dainik Gomantak
गोवा

Mahanand Naik Goa: 16 महिलांची हत्या करणारा ‘दुपट्टा किलर’, गोव्यातला Serial Killer जो एका कॉलमुळे जाळ्यात अडकला

लहानशा गोव्यात महानंदची दहशत निर्माण झाली होती आणि पोलिसांपुढे त्याला पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले होते.

Pramod Yadav

Mahanand Naik Goa: सिरीयल किलिंगच्या अनेक घटना आजवर देशविदेशात घडल्या आहेत, अनेक चित्रपट, मालिका आणि माहितीपट यावर येऊन गेलेत, शिवाय भविष्यात देखील येत राहतील. प्रत्येक सिरीयल किलरची एक विशिष्ट मानसिकता असते, हत्येमागे उद्देश असतो आणि ती करण्याची त्याची एक पद्धत असते. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'दहाड' वेब सिरीजमध्ये एक थरारक काहाणी दाखवण्यात आली.

अशाचप्रकारे गोव्याच्या इतिहासातील आजवरचे सर्वात मोठे हत्याकांड आणि त्यामागे मैत्री, लग्नाचे आमिष आणि खून असा समान धागा असलेल्या दुपट्टा किलर महानंद नाईकची (Dupatta Killer) कहाणी देखील एखाद्या थरारपटासारखीच भयावह आहे. 1994 ते 2009 असे 15 वर्षे तो पोलिसांना गुंगारा देत दुष्कर्म करत राहिला. लहानशा गोव्यात महानंदची दहशत निर्माण झाली होती आणि पोलिसांपुढे त्याला पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले होते.

फोंडातील ती मुलगी बेपत्ता झाली आणि....

फोंडा पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार आली अन् तपासाला सुरूवात झाली. फोंडा पोलिस ठाण्यात 2009 साली एक तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली होती. पण, तरुणीचा मोबाईल नाही. मात्र मोबाईलच्या नंबरवरील कॉलची माहिती मिळवण्यात आली तेव्हा त्यात नंबरवरती अनेक फोन आल्याचे निष्पन्न झाले. त्यातील एका फोन कॉलची माहिती काढली असता तो सांगे येथील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या मुलाचा असल्याची माहिती समोर आली. पण, मुलाची चौकशी केली असता त्याने त्याचा मोबाईल बसमध्ये पडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

"हा नंबर महानंद नाईक वापर होता व त्यावरून अनेक महिलांना दररोज कॉल केले जात असल्याचे तपासात समोर आले. दरम्यान, यातील एका महिलेची चौकशी केली असता तिने महानंद नाईक फोन करून त्रास देतो तसेच, अत्याचार करत असल्याची माहिती दिली. महिलेने रडत रडत याविषयी पोलिसांना त्याच्या सर्व कृत्यांची माहिती दिली तसेच, तिने आत्महत्या देखील करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी याप्रकरणात बलात्काराचा गुन्हा दाखल करून महानंद नाईक याला अटक करून रिमांड घेतला व चौकशीला सुरूवात झाली, अशी माहिती याप्रकरणाचे तपास अधिकारी सी. एल. पाटील यांनी दिली.

आणि महानंद नाईकने पहिला खून मान्य केला...

फोंड्यातील बेपत्ता महिलेचा तपास करताना पोलिसांना वाळपईत एका अनोळखी महिलेचा मृतदेह मिळाला होता. मात्र, त्याची विल्हेवाट लावण्यात आली होती, अशी माहिती पाटील यांनी दिली. संशयाची सुई महानंदकडे वळली. पोलिसांनी चलाखीने महानंदला हा गुन्हा मान्य करायला लावला.

पोलिसांची खेळी ठरलीय यशस्वी

ज्या महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता ती महिला जिवंत असल्याचे पोलिसांनी महानंदला सांगितले. ती महिला पोलीस ठाण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले. पोलिसांची ही खेळी यशस्वी ठरली आणि घाबरलेल्या महानंदने तिच्या हत्येची कबुलीच दिली. महानंदने दुपट्ट्याने गळा आवळून त्या महिलेची हत्या केली होती, असे सी. एल. पाटील यांनी सांगितले.

'महानंद नाईक याने फोंड्यातील महिलेचा 10 जानेवारी 2009 रोजी मोर्ले-सत्तरी येथे दुपट्ट्याने गळा आवळून खून केला. तसेच, सोन्याचे दागिने चोरी केले आणि काजूच्या झाडाला फास लावून जीवे मारले.' असे फोंडा पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

पत्नीची मैत्रिण असलेल्या महिलेवर केलेल्या बलात्कार प्रकरणात तो सापडला, त्यानंतर एक - एक प्रकरण समोर येत गेले आणि त्यातील काही प्रकरणाची कबुली महानंद याने दिल्याने या सिरीयल किलिंगचा उलगडा झाला, असे पाटील सांगतात.

1995 सालीच पहिल्यांदा अटक केली होती पण...

महानंद नाईक याला 1995 मध्येही एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी रिक्षा चालकांनी फोंडा पोलीस ठाणे येथे मोर्चा काढत आंदोलन केले. तसेच, नाईक आमच्या सोबत होता व तो जेवण करण्यासाठी घरी गेल्याचे सांगितले आणि त्याची सुटका झाली. हे देखील एका महिलेचं प्रकरण होतं.

पण, पोलिसांनी त्यावेळी महानंद खरच जेवण करण्यासाठी घरी गेला होता की नाही याबाबत सत्यता पडताळली नाही, असे सी. एल पाटील यांचे म्हणणे आहे.

14 वर्षांनी हत्येची कबुली

11 सप्टेंबर 1995 रोजी बेतोडा येथे निर्जनस्थळी महानंदने एका महिलेचा खून करून दागिने पळविले असा आरोप त्याच्यावर होता. या खुनाची कबुली महानंद नाईकने तब्बल 14 वर्षानंतर 3 मे 2009 रोजी दिली. विशेष म्हणजे याच प्रकरणात 1995 मध्ये त्याला अटक झाली होती. मात्र, पुराव्या अभावी त्याला सोडावं लागले होते.

अशी होती मोडस ऑपरेन्डी

महानंद नाईक गरीब घरच्या मुलींना हेरून त्यांच्याशी मैत्री करायचा, त्यांना विविध प्रलोभने दाखवून विश्वास जिंकायचा आणि लग्नाचे आमिष दाखवत असे. याकाळात तो महिलांशी शारीरिक संबध प्रस्थापित करत असे. महिलांना भेटायला बोलवताना तो त्यांना घरातून दागिने आणि पैसे घेऊन यायला सांगत असे. दरम्यान, संधी साधून महानंद महिलांचा दुपट्ट्याने गळा आवळून खून करायचा. अखेर, फोंड्यातील दोन महिलांची हत्या आणि एका बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली.

महानंद नाईक अतिशय चाणाक्ष सिरियल किलर होता, पुरावे गोळा करताना तसेच, ते सिद्ध करताना पोलिसांची दमछाक झाली. मृतदेह मिळत नव्हते, मिळाले तर कुठे फक्त हाडे किंवा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळायचे. त्यामुळे या प्रकरणात अनेक अडचणी आल्या मात्र, अखेर तपासाअंती सत्य समोर येत गेले, असे पाटील यांनी सांगितले.

14 वर्षानंतर आला कारागृहाबाहेर

महानंद नाईक (Serial Killer Mahanand Naik Goa) याला 14 वर्षानंतर फर्लो मंजूर (Furlough) झाला आहे. गुरूवारी संध्याकाळी (दि.15 जून) महानंद कोलवाळ कारागृहातून बाहेर आला आहे. 21 दिवसानंतर म्हणजेच 05 जुलै रोजी महानंद पुन्हा कारागृहात दाखल होईल.

महानंद बाहेर येताच या प्रकरणातील एका पिडितेने तिला त्याच्यापासून धोका असल्याचे म्हणत संरक्षणाची मागणी केली. महिलेने अर्ज केल्यानंतर तिला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. महानंद कारागृहात असताना देखील काही महिलांना फोन करून त्रास देत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

दरम्यान, महानंद नाईक याला फर्लो मंजूर झाल्यानंतर काही सामजिक नेते याला विरोध करीत असून, महानंदचा तुरूंगातून बाहेर पडल्यानंतरचा फोटो सार्वजनिक करण्याची मागणी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT