Goa Vs Oman Dainik Gomantak
गोवा

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Goa cricket team Oman victory: गोव्याच्या सीनियर पुरुष क्रिकेट संघाने दुर्मीळ असा परदेशातील मालिका विजय साकारला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्याच्या सीनियर पुरुष क्रिकेट संघाने दुर्मीळ असा परदेशातील मालिका विजय साकारला. तिसऱ्या एकदिवसीय (सराव) क्रिकेट सामन्यात त्यांनी यजमान ओमानचा १२६ धावांनी धुव्वा उडवून २-१ अशी बाजी मारली.

ओमान क्रिकेट अकादमीच्या मैदानावर सोमवारी रात्री गोव्याने दिलेल्या ३०६ धावांच्या आव्हानासमोर ओमानचा संघ १७९ धावांतच गारद झाला. गोव्याचा ऑफस्पिनर अभिनव तेजराणाने ३७ धावांत ४ गडी टिपले. आगामी आशियाई प्रीमियर कप आणि विश्वकरंडक लीग २ स्पर्धेसाठी तयारी करणाऱ्या ओमानच्या संघासाठी एकदिवसीय लढतींचे निकाल धक्का देणारे ठरले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्यांना गोव्याने सहा विकेट्सने हरविले होते. तिसऱ्या सामन्यात शतकवीर शिवेंद्र भुजबळ (नाबाद १४३) व कर्णधार स्नेहल कवठणकर (७१) यांच्या दमदार फलंदाजीमुळे गोव्याने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ३०५ धावा केल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक : गोवा : ५० षटकांत ८ बाद ३०५ वि. वि. ओमान : ३८.१ षटकांत सर्वबाद १७९ (मुजिबूर अली ४४, हम्माद मिर्झा २९, जितेन रामानंदी ५६, वासुकी कौशिक ८-२-२९-१, फेलिक्स आलेमाव ४-०-२९-१, हेरंब परब ८-०-३६-२, दीपराज गावकर ४.१-०-१९-२, अभिनव तेजराणा १०-०-३७-४, विकास सिंग ४-०-२६-०).

मुख्यमंत्र्यांकडून संघाचे अभिनंदन

ओमान दौऱ्यात ऐतिहासिक मालिका यश प्राप्त केलेल्या गोव्याच्या सीनियर पुरुष क्रिकेट संघाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोशल मीडियाद्वारे अभिनंदन केले आहे. गोमंतकीय क्रिकेटसाठी ही घटना अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले असून संघ व्यवस्थापक सिद्धेश साळुंके, मुख्य प्रशिक्षक दिनेश मोंगिया, कर्णधार स्नेहल कवठणकर व संघातील प्रत्येक सदस्याचे कौतुक केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT