Sea Food Dainik Gomantak
गोवा

Goa Sea Food Festival: फेस्टिव्हलची सुनावणी 26 मार्चला

Goa Sea Food Festival: गोवा सरकारच्या निर्णयावर उच्च न्यायालयाची टीका

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Sea Food Festival: मिरामार सीफूड फेस्टिव्हल या प्रकरणात गोवा सरकारने उच्च न्यायालयासमोर विधान केले की ते  हे सीफूड फेस्टिव्हल योग्य तारखेसाठी पुढे ढकलण्यास तयार आहे. उच्च न्यायालयाने सरकारचे हे म्हणणे स्वीकारले असून पुढील सुनावणी 26 मार्चला पुढे ढकलण्यात आली आहे.

गुरुवारी (ता.8) उच्च न्यायालयात, मिरामार सीफूड फेस्टिव्हलबाबत सुनावणी होती. यावेळी गोवा सरकारने उच्च न्यायालयात हे सीफूड फेस्टिव्हल इतर योग्य तारखेला पुढे धकलण्यास मंजुरी दिली आहे. 

पर्यटन विभागातर्फे ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येणारा प्रसिद्ध सी फूड फेस्टिव्हल पुढे ढकलणे अशक्य आहे असे उत्तर राज्य सरकारने बुधवारी उच्च न्यायालयात दिले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरिवारी पुढची सुनावणी ठेवण्यात आली होती.

सरकारची फेस्टिव्हलची कागदपत्रे फेस्टिव्हल सुरू व्हायच्या दोन तीन दिवस अगोदर सादर करण्यावरही उच्च न्यायालयाने बुधवारी टिप्पणी केली होती आणि म्हटले होते की, सनबर्न फेस्टिव्हलच्या बाबतीत, सरकारने दोन दिवस आगाऊ परवानगी देणे हा एक अलिखित नियम बनला आहे.

अशा प्रकारे सरकार न्यायालयीन पुनरावलोकन नाकारणे आणि नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचेही उच्च न्यायालयाने नमूद केले होते.

सीफूड फेस्टिव्हल आयोजित करण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावर फूड फेस्टिव्हल होणार नाही, या न्यायालयाच्या सरकारने दिलेल्या वचननाम्याचे उल्लंघन आहे, असेही न्यायालयाने यावेळी म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT