Teacher Transfer Protest Dainik Gomantak
गोवा

Teacher Transfer Protest: बदली रद्द करा! शिक्षिकेच्या तडकाफडकी बदलीविरोधात गावडोंगरी शाळेतील विद्यार्थी पटांगणात ठाण मांडून; पालक आक्रमक

Gawdongri Students Boycott Classes: झिल्तावाडी-गावडोंगरी येथील प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थींनी वर्गात न जाता गेल्या दोन‌ दिवसांपासून पटांगणात ठाण मांडून पसंत केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

काणकोण: गावडोंगरी येथील प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिकेची बदली रद्द करण्यासाठी पालकांनी तालुका शिक्षणाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. या शिक्षिकेची बदली रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. उल्लेखनीय म्हणजे, विद्यार्थ्यांनीही सलग दोन दिवस वर्गावर बहिष्कार टाकला. झिल्तावाडी-गावडोंगरी येथील प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थींनी वर्गात न जाता गेल्या दोन‌ दिवसांपासून पटांगणात ठाण मांडून पसंत केले. हे विद्यार्थी आपल्या शिक्षिकेची शैक्षणिक वर्षाच्या ऐन काळात तडकाफडकी बदली केल्याने नाराज झाले आहेत.

पालकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. या महिन्यात शाळेचे स्नेहसंमेलन व सहल आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा तोंडावर आली असताना अचानक शिक्षिकेची (Teacher) बदली करून शिक्षण खाते नेमक काय सिद्ध करू पाहते, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला.

दरम्यान, या शाळेत पटसंख्या घटली असताना या शिक्षिकेने गावात फिरून विद्यार्थ्यांची संख्या वाढवली, तिने विद्यार्थ्यांची मने जिंकली. आता त्यांचीच अचानक बदली करीत असल्यामुळे आम्ही शाळेत जाणार नसल्याचे मुले सांगत आहेत. या शिक्षिकेची बदली रद्द करण्याबाबतचे निवेदन शिक्षण खात्यालाही पाठवण्यात आल्याचे पालकांनी सांगितले.

१.झिल्तावाडी-गावडोंगरी येथील सरकारी प्राथमिक शाळेचे वर्गावर बहिष्कार टाकून पटांगणात बसलेले विद्यार्थी (Student).

२.झिल्तावाडी-गावडोंगरी येथील सरकारी प्राथमिक शाळेचे पालक शिक्षिकेची बदली रद्द करण्याचे निवेदन तालुका शिक्षणाधिकाऱ्याना देताना.

३.झिल्तावाडी-गावडोंगरी येथील सरकारी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व पालक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT