Ganesh Chaturthi  Dainik Gomantak
गोवा

Ganesh Idol: '..बाल भक्ता लागे तूचि आसरा'! चिमुकल्यांनी बनवल्या गणेशमूर्ती; विसर्जनानंतर उगवणार सूर्यफुलांची रोपे

Ganesh Chaturthi 2025: 'निर्गुण-निराकार' हे गणेशाचे स्वरूप भजन-आरतींमध्ये आळवूनदेखील गणेश मूर्ती सुबक-सुंदर असावी या हव्यासापायी आज अनेक जण वातावरण प्रदूषित करणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीमागे धावत आहेत.

Sameer Panditrao

शालेय विद्यार्थ्यांनी गणेश मूर्ती तयार करण्याचे महत्त्व काय आहे? 'निर्गुण-निराकार' हे गणेशाचे स्वरूप भजन-आरतींमध्ये आळवूनदेखील गणेश मूर्ती सुबक-सुंदर असावी या हव्यासापायी आज अनेक जण वातावरण प्रदूषित करणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीमागे धावत आहेत. स्वतःच्या हातून बनल्या गेलेल्या, काहीशा वेड्यावाकड्या असलेल्या गणेश मूर्तीत देवत्वाची प्रतिष्ठापना होऊ शकत नाही काय? 

स्वतःच्या हाताने तयार केलेली मातीची गणेश मूर्ती ही  पाण्यात होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येचे उत्तर असू शकते हे जाणून दै. गोमन्तकने कुजीरा येथील के. ब. हेडगेवार विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या गणेश मूर्ती निर्मिती स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अप्रतिम प्रतिसाद दिला आणि अतिशय आकर्षक गणेश मूर्ती तयार केल्या. 

के. ब. हेडगेवार विद्यालयाच्या विद्यार्थ्याबरोबर दै. गोमन्तकने सतत तिसऱ्या वर्षी हा उपक्रम आयोजित केला होता. या उपक्रमाला पणजी रोटरी क्लबचे सहकार्य लाभले त्याचबरोबर मांद्रे, पेडणे येथील बापुजी कला संगमने उत्तम दर्जाची माती पुरवली होती.

मातीत सूर्यफुलांच्या बिया मिसळून त्यांना मूर्तीचा भाग बनवणे ही देखील या उपक्रमातील उल्लेखनीय अशी गोष्ट होती. गणेश विसर्जनानंतर या बिया मातीत मिसळून सूर्यफुलांची रोपे रुजून यावीत ही अभिनव कल्पना त्यामागे होती. 

विद्यालयाचे कलाशिक्षक प्रवीण नाईक यांनी प्राथमिक वर्गातील मुलांना अतिशय सोप्या पद्धतीने गणेश मूर्ती कशी तयार करता येते याचे प्रात्यक्षिक यावेळी दिले. प्रात्यक्षिक देताना गणेश मूर्ती मातीची का असावी हे देखील त्यांनी विद्यार्थ्यांना उद्बोधकपणे समजावून सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT