Goa School  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील वर्ग सुरू करण्याच्या निर्णयावर 'टांगती तलवार'

5 वी ते 8 वीपर्यंतच्या वर्गांबाबत संभ्रम

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबतचा (Goa School) निर्णय राज्य सरकारने (Goa State) पुन्हा एकदा कृती दलाच्या कोर्टात टाकला आहे. मात्र, राज्यातील शाळा कोरोनाविषयक नियमांचे पालन करून सुरू कराव्यात, अशी शिफारस कृती दलाने यापूर्वीच केली आहे. याबाबतचा निर्णय कृती दल आणि शिक्षण खात्याच्या बैठकीनंतरच होईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

कोरोनामुळे सलग दोन वर्षांपासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालये बंद होती. त्यापैकी नववीपासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतचे शिक्षण ऑनलाईनऐवजी ऑफलाईन करावे, असे शिक्षण खात्याने सुचवल्याने सध्या हे शिक्षण ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी सुरू आहे. इतर शाळांच्या बाबतीत राज्य सरकारने संबंधित शाळा प्रशासनाला निर्णय घेण्याची सूचना केली होती. मात्र, पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले नव्हते. सध्या अनेक शाळांना जागेचा प्रश्न असून कोरोना नियमानुसार शाळा सुरू करणे शक्य नाही. त्यामुळे एसओपीमध्ये सुधारणा करणे गरजेचे असल्याचे शाळा व्यवस्थापनांचे मत आहे.

पाचवी ते आठवीपर्यंतच्या वर्गाबाबतचा निर्णय हा कृती दल आणि शिक्षण खात्याच्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर घेण्यात येईल. सध्या राज्यात दिवाळीचा सण असल्याने याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

सध्या कोरोना लागण दर आणि मृत्यू दर दोन्हीही नियंत्रणात आहेत. मात्र, दुसरी लाट अद्यापही संपलेली नाही. तिसरी लाट आलीच तर ती सौम्य असण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्त करत आहेत. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत कोणतीच हरकत नाही.

- डॉ. शेखर साळकर,

सदस्य, कृती दल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT