BalRath Employee Strike Dainik Gomantak
गोवा

BalRath Employee Strike : बालरथ कर्मचारी 17 पासून संपावर; मागण्या मान्य न झाल्याने घेतला निर्णय

बालरथ बसेस चालक व वाहकांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत

गोमन्तक डिजिटल टीम

सरकार बालरथ कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास अपयशी ठरल्याने राज्यातील बालरथ कर्मचारी संघटनेने 17 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे जाहीर केले. बालरथ चालकांनी आज बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगास यांची भेट घेतली. यावेळी बालरथ कर्मचारी उपस्थित होते.

नोकरीची सुरक्षा, पगारात वाढ, पीएफ आणि विमा या बालरथ कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

"बालरथ कर्मचारी 2016 पासून आपल्या मागण्या सरकारसमोर मांडत आहेत. 2016 मध्ये सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे सरकार या कर्मचाऱ्यांना लॉलीपॉप दाखवत आहे."

"या सर्व गोंधळासाठी मुख्य सचिव जबाबदार आहेत. असोसिएशनने मुख्य सचिवांना सर्व समस्यांबद्दल 30 तारीखला पत्र दिले होते. मात्र त्यावर मुख्य सचिवांनी कोणतीच कारवाई केली नाही. तेव्हाच त्यांनी जलद कारवाई करून समस्या सोडवायला हवी होती."

"बालरथ कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरात लवकर मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी. मानसिक तणावाखाली बालरथ चालकांनी वाहन चालविले तर अपघात होण्याचे शक्यता आहे. या बाबींवर मुख्य सचिवांनी लक्ष घालून त्यांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी यावेळी व्हिएगास यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa Live Updates: गोव्याचा सन्मान! बेस्ट कोस्टल स्पिरीट शोकेस पुरस्काराने गौरव

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

Goa Politics: ''महाराष्ट्रात महायुतीला विजय मिळाला म्हणून गोव्यातील विरोधक...''; सरदेसाईंचा घणाघात

SCROLL FOR NEXT