Goa Education Department Dainik Gomantak
गोवा

Goa Education: विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका, शैक्षणिक वर्ष जूनमध्येच सुरू करा! शिक्षण संचालकांकडे पालकांची मागणी

Goa School Academic Year: एप्रिलमध्ये नवीन वर्ष सुरू करण्याऐवजी ते पूर्वीप्रमाणे जूनमध्येच सुरू करावे, असे प्रतिपादन पालक सिसिल रॉड्रिगीस यांनी केले.

Sameer Panditrao

Goa School Academic Year Parents Suggestion

पणजी: २८ मार्च रोजी विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपतील आणि नंतर पुन्हा १ एप्रिलला नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल. तेव्हा विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण घालविण्यासाठी नवीन शैक्षणिक वर्षाच्या तयारीसाठी वेळच मिळणार नाही.

त्यामुळे एप्रिलमध्ये नवीन वर्ष सुरू करण्याऐवजी ते पूर्वीप्रमाणे जूनमध्येच सुरू करावे, असे प्रतिपादन पालक सिसिल रॉड्रिगीस यांनी केले.

शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांना शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू करावे यासंबधी राज्यातील विविध भागातून आलेल्या पालकांसमवेत निवेदन दिल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.

सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थी विविधांगी कार्यशाळांमध्ये सहभागी होत असतात, परंतु या निर्णयामुळे एकाअर्थी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात अडथळा निर्माण होतो.

एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्यासाठी शैक्षणिक संस्था, पालक, पालक शिक्षक संघाशी चर्चेविनाच हा निर्णय घेण्यात आला.

उष्म्याच्या कालावधीत शाळेत ज्या साधनसुविधा हव्यात त्या अनेक शाळांमध्ये उपलब्ध नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Usgao Market: उसगावच्या मार्केटला देणार 'रवी नाईक' यांचे नाव! विश्‍वजीत राणे यांची घोषणा; 25 कोटी खर्चून उभारणार प्रकल्प

Goa ZP Election: गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीबाबत मोठी अपडेट! गावांची व प्रभागांची संख्या अधिसूचित; वाचा संपूर्ण यादी

Goa Politics: खरी कुजबुज; सांग सांग भोलानाथ पाऊस जाईल का?

Electricity Price Hike: 'हा तर दिवसाढवळ्या गोव्यातील ग्राहकांवर दरोडा', वीज दरवाढीवरून आप आक्रमक; पालेकरांचा आंदोलनाचा इशारा

Ranji Trophy: 'करुण नायर'ची गोव्याविरुद्ध झुंजार खेळी! 'अर्जुन तेंडुलकर'चा भेदक मारा; कर्नाटक पहिल्या दिवसअखेर 5 बाद 222

SCROLL FOR NEXT