Savitri Kavalekar, wife of Babu Kavalekar Dainik Gomantak
गोवा

Goa: सावित्री कवळेकर यांचा सांगे भाजप उमेदवारीवर दावा

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Babu Kavalekar) यांच्या पत्नी आणि भाजप महिला मोर्चाच्या राज्य कार्यकरिणीच्या उपाध्यक्ष सावित्री कवळेकर (Savitri Kavalekar) यांनी सांगे मतदारसंघात भाजप (Bjp) उमेदवारीवर आपला दावा सांगितला आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव : उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Babu Kavalekar) यांच्या पत्नी आणि भाजप महिला मोर्चाच्या राज्य कार्यकरिणीच्या उपाध्यक्ष सावित्री कवळेकर (Savitri Kavalekar) यांनी सांगे मतदारसंघात भाजप (Bjp) उमेदवारीवर आपला दावा सांगितला आहे. एवढे दिवस त्यांनी या मतदारसंघात आपले काम चालू ठेवले होते पण जाहीरपणे त्यांनी कधीही उमेदवारीच्या शर्यतीत असल्याचे जाहीर केले नव्हते. पण काल रविवारी त्यांनी पहिल्यांदाच आपणही तिकिटाच्या शर्यतीत असल्याचे जाहीर केले.

सांगे येथील मोटारसायकल व रिक्षा चालकांना रविवारी त्यांनी रेनकोटचे वाटप केले. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना , होय मी सुद्धा भाजपच्या उमेदवारीच्या शर्यतीत आहे. पण पक्ष घेणार तो निर्णय मला मान्य असेल असे त्या म्हणाल्या. 2017 मध्ये त्यांनी या मतदारसंघात काँग्रेसच्या (Congress) उमेदवारीवारी निवडणूक लढविली होती. त्यानंतर त्यांचे पती बाबू कवळेकर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्याही भाजपात आल्या होत्या. 2017 च्या निवडणुकीत या मतदारसंघातून सुभाष फळदेसाई (Subhash Phaldesai) हे भाजपचे उमेदवार होते.

यावेळी मेश्यू डिकॉस्ता (Meshu DiCosta) आणि संगमेश्वर नाईक या दोन नागरसेवकांनीही सावित्री याच सांगे मतदारसंघासाठी चांगल्या उमेदवार असल्याचे सांगितले. डिकॉस्ता म्हणाले, मागच्या निवडणुकीत जरी कवळेकर याना पराभव स्वीकारावा लागला तरी त्यांनी या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले नाही. आमदार नसताना देखील त्यांनी या मतदारसंघात बरीच कामे केली असे त्यांनी सांगितले.

नाईक यांनीही कवळेकर याच सांगेसाठी योग्य उमेदवार आहेत असे सांगताना त्यांच्या समाजकार्यामुळे त्या या मतदारसंघात लोकप्रिय असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आमदार सुभाष फळदेसाई यानीही सांगेतून भाजप उमेदवारीवर आपला दावा यापूर्वी सांगितला होता. आता कवळेकर यांनीही दावा सांगितल्याने या मतदारसंघात भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू होणार याचे संकेत मिळू लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT