Bhumiputra Group  Dainik Gomantak
गोवा

Goa Tiger Sanctuaries: सरकारच्या 'त्या' भूमिकेचे सत्तरीतून स्वागत, भूमिपुत्र संघटना म्हणते, ''आधीच म्हादई अभयारण्यामुळे...

व्याघ्र क्षेत्र निर्माण करण्याचा कोणीही तसा प्रयत्न केला तर सत्तरीतील 'भूमिपुत्र' गप्प बसणार नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Tiger Sanctuaries ''सत्तरी तालुक्यात पुर्वापारपणे ग्रामीण भागात लोक जीवन जगत आहे. 1999 साली म्हादई अभयारण्य घोषीत करुन आधीच लोकांचे कंबरडे मोडलेले असताना आता पर्यावरण प्रेमींकडून व्याघ्र क्षेत्रासाठी अट्टाहास केला जात आहे.

तो कदापीही आम्हाला मान्य नाही. सरकारने व्याघ्र क्षेत्रा विरोधात निर्णय घेत सत्तरीतील भुमिपुत्रांना मोठा दिलासा दिला आहे. त्याचे आम्ही स्वागत करीत आहे'', असे सत्तरी भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र गावस यांनी केले आहे.

यासंबंधी भुमीपुत्र संघटनेतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष हरिश्चंद्र गावस, पदाधिकारी आंतोनियो पिंटो, बातू गावडे, शिवलो झर्मेकर वासू केरकर यांची उपस्थिती होती.

व्याघ्र क्षेत्र निर्माण करण्याचा कोणीही तसा प्रयत्न केला तर सत्तरीतील भुमीपुत्र गप्प बसणार नाही. कोणत्याही परिस्थितीत व्याघ्र क्षेत्र होऊ देणार नाही. हिंमत असेल तर वाळपईत व्याघ्र क्षेत्र समर्थनार्थ सभा घेऊन दाखवावी. आम्हीही तेवढ्याच ताकदीने शक्ती दाखवणार आहोत असा इशाराही यावेळी देण्यात आला.

दरम्यान म्हादई अभयारण्यातील प्रस्तावित व्याघ्र प्रकल्पाचा प्रस्ताव फेटाळणे, हे सरकारचे दुर्दैव आहे, असे मत म्हादई बचाव संघटनेच्या नेत्या निर्मला सावंत यांनी व्यक्त केले आहे. या कृतीविरोधात त्याने सरकारचा निषेधही केल होता.

तर ''खाण व्यवसाय कसल्याही परिस्थितीत सरकारला चालू करायचा आहे, त्यासाठीच सरकारी पातळीवर व्याघ्र प्रकल्पाला विरोध होत आहे असे पर्यावरणप्रेमी रमेश गावस यांनी याअगोदर म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वाघाची स्टायलिश एन्ट्री! पिंजऱ्यातून बाहेर येताच नदीत उडी, सुंदरबनचा Video पाहून थक्क व्हाल

Electricity Issue: राजीव गांधी कला मंदिरात 'बत्ती गुल'! विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात अचानक गेली लाईट

IND vs ENG 4th Test: लॉर्ड्सनंतर आता मँचेस्टर! 'सर' जडेजा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर; कराव्या लागणार 'इतक्या' धावा

Latest Mobile Phones: 12GB रॅम, 5700mAh बॅटरी...24 जुलैला लाँच होणार 'हा' जबरदस्त स्मार्टफोन! किंमत ऐकल्यावर तुम्ही थक्क व्हाल

Rishabh Pant Record: ऋषभ पंत बनणार 'षटकार किंग', मोडणार रोहित-सेहवागचा महान विक्रम! फक्त 3 षटकारांची गरज

SCROLL FOR NEXT