Vijay Sardesai | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Vijay Sardesai: सरकारच्‍या आशीर्वादाशिवाय धान्याचा काळाबाजार अशक्य

Vijay Sardesai: अनागोंदी कारभाराला मुख्यमंत्रीच जबाबदार

दैनिक गोमन्तक

Vijay Sardesai: नागरीपुरवठा खात्याच्या गोदामातून धान्याचा जो काळाबाजार सुरू आहे, तो सरकारी आशीर्वादाशिवाय अशक्य आहे. मी गेल्या कित्येक वर्षांपासून या प्रकरणी आवाज उठवत आहे. त्याचा प्रत्‍यय आता येऊ लागला आहे, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी आज मडगावात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सध्‍या सरकार चालत नाहीय, ते ठप्‍प पडलं आहे. सरकारमध्ये जो अनागोंदी कारभार सुरू आहे, त्याला सरकारचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेच जबाबदार असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला. सरकारला म्हादई प्रश्र्न सोडविता आला नाही. मुख्यमंत्री म्हणतात की, स्वत:च्या आईपेक्षा आपल्याला म्हादई सर्वश्रेष्ठ आहे.

असे असतानाही कर्नाटक सरकारचा यासंदर्भात होत असलेला हस्तक्षेप मुख्‍यमंत्र्यांना अडविता आलेला नाही, असेही ते म्‍हणाले. पुढील वर्षी कर्नाटकात निवडणुका होत असल्याने तेथील भाजप सरकारला हवा तसा निर्णय घेण्‍यास गोव्‍यातील भाजप सरकार सहकार्य करीत असल्‍याचा सनसनाटी आरोपही सरदेसाई यांनी केला.

साळ नदीची किंवा पश्र्चिम बगलमार्गाची मुख्यमंत्र्यांनी केवळ पाहणी करून काहीच होणार नाही. त्‍यांनी साळ नदी स्वच्छता मोहीम ताबडतोब हाती घ्यावी. तसेच पश्र्चिम बगलमार्ग लोकांच्या मागणीप्रमाणे खांबांवर बांधावा, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.

सरकारकडून जनहितविरोधी निर्णय

राज्‍यातील भाजप सरकारमधील नेते मोठमोठी भाषणे ठोकतात, मात्र सामान्य लोकांना त्रासदायक ठरतील असेच निर्णय घेऊन मोकळे होतात. आपल्या स्वार्थासाठी जे आठ जण या सरकारात सामील झालेले आहेत, त्यामुळेच सरकार ला आपण सर्वेसर्वा आहोत असेच वाटत आहे. पण सरकारे येतात आणि जातात. लोकांच्‍या प्रश्र्नांना उत्तरे देण्यात आपण बांधील आहोत हे या नेत्‍यांनी विशेषत: मुख्‍यमंत्र्यांनी विसरू नये, असे सरदेसाई म्‍हणाले.

"सध्‍या सरकारमध्ये जो अनागोंदी कारभार सुरू आहे, त्यास सरकारचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेच जबाबदार आहेत. गरिबांसाठी असलेल्‍या धान्‍याचा राजरोस काळाबाजार सुरू आहे. पण या भ्रष्‍टाचारी सरकारला काहीच पडलेले नाही."

- विजय सरदेसाई, गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फुल पैसा वसूल! रोहित शेट्टी आणतोय 'Golmaal 5', गोव्यात होणार शूटिंगची सुरुवात; अजय देवगणनं दिलीये हिंट

Delhi Airport Technical Glitch: 800 फ्लाईट्सना विलंब, अनेक रद्द; दिल्ली विमानतळावर तांत्रिक अडचणीचा हजारो प्रवाशांना फटका

"तुझी मासिक पाळी संपली की सांग...": महिला क्रिकेटपटूचा सिलेक्टरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, क्रीडा विश्वात खळबळ

समुद्रकिनारी रंगला भव्य विवाह! तेजश्री प्रधानने गोव्याच्या किनाऱ्यावर केलं 'Destination Wedding' शूट

Goa Today's News Live: काणकोण बसस्थानकाजवळील रस्त्याची दुर्दशा, चालक हैराण

SCROLL FOR NEXT