गोवा

Goa: खोतोडा पंचायतीच्या सरपंचपदी संतोष गावकर

खोतोडा सत्तरी ग्रामपंचायतीच्या (Khotoda Sattari Gram Panchayat) सरपंचपदी संतोष गावकर (Santosh Gavkar) यांची बिनविरोध आज मंगळवारी निवड करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

वाळपई: खोतोडा सत्तरी ग्रामपंचायतीच्या (Khotoda Sattari Gram Panchayat) सरपंचपदी संतोष गावकर (Santosh Gavkar) यांची बिनविरोध आज मंगळवारी निवड करण्यात आली आहे. यावेळी उपसरपंच शारदा हरिजन (Sharda Harijan) पंच प्रतिक्षा च्यारी, पंच भरत नाईक, पंच राजेश पर्येकर, विद्यमान नगरगाव जिल्हा पंचायत सदस्य सौ. राजश्री काळे, माजी नगरगाव जिल्हा पंचायत सदस्य प्रेमनाथ हजारे (Premnath Hazare) आदींची उपस्थिती होती. अलिखित करारानूसार सरपंच राजेश पर्येकर (Rajesh Paryekar) यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

त्यामुळे रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी आज मंगळवारी निवडणूक घेण्यात आली. संतोष गावकर यांचा एकमेव अर्ज सरपंच पदासाठी दाखल झाला होता. त्यांना सुचक अनुमोदन म्हणून शारदा हरिजन व प्रतिक्षा च्यारी यांनी समर्थन दिले. माजी नगरगाव जिल्हा पंचायत सदस्य प्रेमनाथ हजारे, विद्यमान नगरगाव जिल्हा पंचायत सदस्य सौ. राजश्री काळे आदींनी संतोष गावकरचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

संतोष गावकर म्हणाले आपण आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच कार्यरत राहणार आहे. खोतोडा पंचायत भागातील विविध समस्या सोडविण्यासाठी सदैव कार्यरत राहून विकास कामांना सरकारच्या माध्यमातून चालना देण्यास प्रयत्नशील राहणार आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT