Dttawadi Temple Theft Dainik Gomantak
गोवा

Dattawadi Temple Theft: दत्तवाडी मंदिरातील 3 पुरातन मूर्तींची चोरी, डिचोली पोलिसांकडून दोघांना अटक, वाहन जप्त

Goa Temple Theft: देवालय प्रशासक तथा डिचोलीच्या मामलेदारांनी केलेल्या तक्रारीला अनुसरून पोलिसांनी ‘बीएनएस’च्या ३०५ आणि २९९ रीड व्हिथ ३(५) गुन्हा नोंद करून वरील कारवाई केली.

Sameer Panditrao

डिचोली: एक पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या साखळी येथील श्री संस्थान दत्तवाडी मंदिरातील देवतांच्या पुरातन तीन मूर्ती गायब होण्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकारामुळे महाजनांमध्ये खळबळ माजली आहे.

दरम्यान, याप्रकरणी डिचोली पोलिसांनी दोघांना अटक केली असून, मूर्तींची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली मोटारगाडी जप्त केली आहे. डिचोलीचे मामलेदार तथा देवालयांचे प्रशासक दत्तप्रसाद तोरस्कर यांनी केलेल्या तक्रारीला अनुसरून पोलिसांनी कारवाई करून श्याम बोडके (साखळी) आणि दीपेश कामत (डिचोली) या संशयितांना अटक केली आहे. गेल्या मंगळवारी (ता.२४) मूर्ती चोरीची ही घटना घडली आहे.

याप्रकरणी देवालय प्रशासक तथा डिचोलीच्या मामलेदारांनी केलेल्या तक्रारीला अनुसरून पोलिसांनी ‘बीएनएस’च्या ३०५ आणि २९९ रीड व्हिथ ३(५) गुन्हा नोंद करून वरील कारवाई केली. मूर्ती चोरून नंतर त्यांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली एक आलिशान मोटारगाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

धार्मिक भावना दुखावल्या

उपलब्ध माहितीनुसार, श्री संस्थान दत्तवाडी मंदिरातील देवी अन्नपूर्णा, गणपती आणि मारुतीराय या तीन देवतांच्या पुरातन आणि मौल्यवान मूर्ती चोरीस गेल्या आहेत. या मूर्तींची परस्पर विल्हेवाट लावून महाजन आणि भाविकांच्या धार्मिक भावना दुखावण्यात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT