Sanjivani Sugar Factory Dainik Gomantak
गोवा

Sanjivani Sugar Factory: ‘संजीवनी’ची एक इंचही जमीन देणार नाही- शेतकऱ्यांचा इशारा

संघटनेचा निर्धार: ऊस उत्पादकांकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष

गोमन्तक डिजिटल टीम

Sanjivani Sugar Factory धारबांदोडा गोमंतक ऊस उत्पादक संघटनेने पत्रकार परिषद घेऊन सरकारने आम्हाला न्याय घ्यावा, अशी मागणी केली. तसेच जोपर्यंत शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणार नाही, तोपर्यंत संजीवनी सहकारी साखर कारखान्याची एक इंचसुद्धा जमीन आम्ही देणार नाही, असा स्पष्ट निर्धार शेतकऱ्यांनी केला.

ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई म्हणाले, सरकार आम्हाला स्पष्ट काहीही सांगत नाही. ऊस उत्पादकांचा प्रश्नही सोडवण्याकडे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दुर्लक्ष करीत आहेत.

यासाठी आम्ही 17 जुलै रोजी आम्ही सर्वसाधारण सभा घेतली, तेव्हा सरकार आम्हाला स्पष्ट सांगत नसल्याने रस्ता रोको करण्याचे स्पष्ट सांगितले.

त्यानुसार आम्ही रस्ता रोको केला, तेव्हा पोलिसांनी आम्हाला ताब्यातही घेतले होते. त्यानंतर आम्हाला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पणजीला बोलविले, तेव्हा आम्हाला ‘एक्झिट’व्हा’, असे सांगितले, हे चुकीचे सांगणे आहे.

हर्षल प्रभुदेसाई म्हणाले, सरकारनेच आम्हांला इथेनॉल प्रकल्प आणतो, असे सांगून फसवले. इथेनॉल प्रकल्पासाठी तुम्ही कंपनी शोधा, आम्ही जमीन व सहकार्य करू, असे तोंडी सांगितले. आम्हांला ‘एक्झिट’ करायचे असेल तर साधन सुविधा समिती कशाला काढली? आम्हांला का झुलवत ठेवले?

संजीवनी सहकारी साखर कारखान्यातील साधन सुविधा समितीचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर यांची भेट घेऊन सर्व समस्या सांगितल्या, तेव्हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट आपण घेणार असून या भेटीत ऊस उत्पादकांचा प्रश्न आपण सविस्तर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले, असे फ्रांसिस मास्करेन्हास यांनी सांगितले.

इथेनॉलसाठी प्रतिसाद नाही!

इथेनॉल प्रकल्पासाठी प्रतिसाद नाही. उसाच्या उपलब्धते अभावी संजीवनी इथेनॉल प्रकल्पासाठी अद्याप कोणीही पुढे आलेले नाही. जर कोणी सहकार क्षेत्रातील हा प्रकल्प चालविण्यास आल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू असे आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहात सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT