Goa Sangodotsav त सहभागी झालेला नौकेतील एक देखावा  दैनिक गोमन्तक
गोवा

Goa Sangodotsav: माशेल-कुंभारजुवेत उद्या सांगोडोत्सव

स्पर्धेचे आयोजन कोविड ‘एसओपी’चे पालन करण्याचे देवस्थानचे आवाहन

दैनिक गोमन्तक

Goa Sangodotsav: माशेल-कुंभारजुवे (Marcel- Cumbarjua) येथील नदीत गुरुवार १६ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता "सांगोडोत्सवा''चे आयोजन करण्यात आले आहे. येथील नदीच्या पात्रात साजरा होणारा सांगोड उत्सव म्हणजे माशेल - कुंभारजुवे गावच्याच नव्हे, तर परिसरातील तरुण-तरुणींना, आबालवृद्धांना मौजमजा व आनंदाची पर्वणीच. गणेश चतुर्थीचा सातवा दिवस हा माशेल - कुंभारजुवेचा सांगोडचा (Boating) अविस्मरणीय दिवस असतो. भाविकांनी यावेळी कोविड `एसओपी’चे (Celebrating with Covide SOP's) पालन करावे, असे श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवस्थानचे अध्यक्ष शिवाजी शेट (Shantadurda Cumbarjuvekarin Temple President Shivaji Shet) यांनी आवाहन केले आहे.

सांगोडोत्सवात पूजलेली गणेश मूर्ती

कुंभारजुवे गावची ग्रामदेवी श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीणच्या गणपती विसर्जनाचा दिवस असल्यामुळे संपूर्ण गावच त्या उत्सवात सामील होतो. सांगोड उत्सवाची परंपरा फार पूर्वीपासून, पोर्तुगीज काळातही सुरू होती. श्री शांतादुर्गेचा एकमेव केशरी रंगाचा गणपती सात दिवस देवस्थानात पूजेला लावून, सातव्या दिवशी संध्याकाळी साडेतीन-चार वाजण्याच्या सुमारास वाजत-गाजत, फटाक्‍यांचा आवाजात मखरात बसवून त्या मूर्तीची मंदिरापासून तारीवाड्यापर्यंत मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत नंतर पूर्वीपासून माशेलचे श्री. करंडे व श्री. सुखटणकर यांचे गणपती सहभागी होतात, अशी ही अनेक वर्षे चालू असलेली परंपरा आहे.

सांगोडोत्सवात सहभागी झालेले विविध नौका देखावे

अलीकडे शांतादुर्गेच्या "सांगोड''बरोबर कुंभारजुवे व माशेल तारीवाड्यावरील वेगवेगळे क्‍लब, सांस्कृतिक संस्था लहान सांगोड तयार करून त्यांच्यावर वेगवेगळे ऐतिहासिक, पौराणिक व सामाजिक विषयावरील आकर्षक चित्ररथ सादर करतात. नदीच्या पात्रात देखण्या तसेच आगळ्या वेगळ्या चित्ररथ, देखाव्यासाठी स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यामुळे सांगोड उत्सवात आकर्षक चित्ररथ तयार करण्यासाठी कलाकारांमध्ये स्पर्धाच चालू असते. सांगोड उत्सवातील चित्ररथांना बक्षिसे दिली जातात. यंदा राजेश फळदेसाई यांनी बक्षिसे पुरस्कृत केली आहेत.

सांगोडोत्सवात सहभागी केलेली पताक्यांनी सजवलेली नौका

नदी किनारी जत्रा

नदीकिनारी तारीवाड्यावर कुंभारजुवे गावचा एक पारंपरिक सांगोड सुशोभित करून सजवून सज्ज असतो, त्या सांगोडात श्री शांतादुर्गेचा गणपती विराजमान होतो. तारीवाड्यावरील मंडळींनी सुखटणकर कुटुंबीयांसाठी सज्ज केलेल्या सांगोडात सुखटणकर कुटुंबीयांचा गणपती बसल्यानंतर सुरू होते, नदीच्या पात्रांत नौकाविहाराचा आगळा - वेगळा कार्यक्रम सुरू होते.

सांगोडोत्सव पाहण्यासाठी जमलेली लोकांची गर्दी

श्री शांतादुर्गेच्या सांगोड परंपरेप्रमाणे बेताळ, ऋध्दी-सिद्धी व इतर सोंगे घेतलेल्यांचे नृत्य. नदीच्या पात्रात वेगवेगळ्या सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक विषयावरील सांगोडवरील चित्ररथ मांडवी नदीच्या पात्रांत सुमारे वीस पंचवीस असे नौकेवरील चित्ररथ पाहण्यास हजारो रसिक प्रेक्षकांची कुंभारजुवे - माशेल नदीकिनारी जणू जत्राच भरलेली असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PAK Fan Controversy Statement: पाकिस्तानचा 'सनकी' चाहता! हारिस रौफला भेटला अन् म्हणाला, "बदला लेना, इंडिया को छोड़ना नहीं..." Watch Video

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला लुबाडले

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

SCROLL FOR NEXT