Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Art Teachers Salary: कला शिक्षकांसाठी मोठी बातमी! वर्षभरानंतर मिळणार वेतन; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Pramod Sawant: राज्यातील शाळांमध्ये समग्र शिक्षा अभियानांतर्गत नाट्य, संगीत, नृत्य, चित्रकला अशा कलाशाखांकरिता शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली.

Sameer Panditrao

पणजी: राज्यात समग्र शिक्षा अभियानांतर्गत कला शिक्षक म्हणून नियुक्त झालेल्या शिक्षकांना अखेर वर्षभरानंतर वेतन मिळणार आहे. त्यांना राज्याच्या निधीतून वेतन देण्याचा निर्णय राज्य सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला.

राज्यातील शाळांमध्ये समग्र शिक्षा अभियानांतर्गत नाट्य, संगीत, नृत्य, चित्रकला अशा कलाशाखांकरिता शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. १५ ऑगस्ट २०२३ रोजी या शिक्षकांची निवड करण्यात आली होती. नियुक्तीनंतर त्यांनी आपापल्या शाळांमध्ये नियमितपणे सेवा सुरू केली आहे. पण आठ महिने उलटून गेले तरी त्यांना एकही महिन्याचे वेतन मिळालेले नव्हते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले, की राज्य सरकार आपल्या निधीतून त्यांना वेतन देणार आहे. त्यासाठीचा तांत्रिक अडथळा दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत महानियंत्रक व महालेखापालांचा २०२३-२४ साठीचा अहवाल स्वीकृत करून विधानसभेत सादर करण्याचेही ठरवण्यात आले आहे. उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा खनिज निधीच्या विनियोगासाठी मिनरल फाऊंडेशनच्या नियुक्तीला कार्योत्तर मंजुरीही देण्यात आली आहे.

सांगे येथील एका पुलाच्या कामात अडथळा ठरत असलेल्या मिनिनो डिसोझा यांच्या घराच्या बदल्यात त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचा १ हजार ४७२ चौरस मीटरचा भूखंड देण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे तो पूल कार्यान्वित करता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zenito Cardozo: 'जेनिटो'ला शिक्षा देताना सत्र न्यायालयाकडून त्रुटी! उच्च न्यायालयाचे निरीक्षण; कार्दोझला फायदा झाल्याचा दावा

Mapusa Theft: म्हापसा दरोडा प्रकरणी दोघा बांगलादेशींना अटक! कर्नाटकात आवळल्या मुसक्या; मुख्य सूत्रधार अजून मोकाट

Ravi Naik Passed Away: गोव्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान कृषिमंत्री रवी नाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Kamdhenu Cow: चेहरा देवीचा, शरीर पशूचे; समुद्रमंथनातून अवतरलेल्या 'कामधेनू गायीचा' वसुबारसशी काय संबंध? वाचा कथा आणि महत्व

Horoscope: नोकरीत प्रगतीची शक्यता, घरात शुभकार्य; प्रिय व्यक्तीकडून आनंददायी बातमी मिळणार

SCROLL FOR NEXT