Indian Railway  Dainik Gomantak
गोवा

Goa News: रेल्वे विद्युतीकरणामुळे प्रदूषणावर आले नियंत्रण

Goa News: कोकण रेल्वेने 1287 कोटी रुपये खर्च करून रोहा ते थोकुर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण केले.

दैनिक गोमन्तक

Goa News: विद्युतीकरणामुळे पर्यावरणाचा नाशही होत नाही. पूर्वी हवेत सोडणाऱ्या धुरामुळे जवळ असलेल्या लोकवस्तीला त्याचा त्रास होत असे. बोगद्यातून जाताना वातानुकूलीन डबे सोडा; पण दुसरा वर्ग किंवा खालच्या वर्गांना खिडक्या उघड्या सोडल्यामुळे धूर आत येऊन प्रवाशांना त्याचा त्रास होत असे, तो आता बंद झाला आहे. ध्‍वनिप्रदूषणही बंद झाले आहे.

कोकण रेल्वेने 1287 कोटी रुपये खर्च करून रोहा ते थोकुर या 740 किलोमीटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण केले. हा प्रकल्प 2016 साली सुरू झाला व मार्च 2022 मध्ये पूर्ण झाल्यावर टप्प्याटप्प्याने रेल्वे वाहतूक विजेवर सुरू केली. सर्वप्रथम रत्नागिरी ते दादर या अंतरामध्ये विजेवरील गाड्या सुरू करण्यात आल्या. सध्या या मार्गावरील सर्व मालवाहू रेल्वे गाड्या तसेच 75 टक्के प्रवासी गाड्या या विजेवरून रस्त्यावर धावत आहेत, ही माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी या प्रतिनिधीला दिली.

कोकण रेल्वे व प्रवाशांना फायद्याचे

रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणामुळे इंधनावर 150 कोटींची बचत होत आहे. प्रवाशांना प्रवासाचे अंतर कमी झाले नाही; पण गाडीचा वेग अंशता वाढविणे शक्य झाल्याने प्रवाशांचा वेळही वाचत आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT