Pavilion Fell Dainik Gomantak
गोवा

Salaulim Dam: कार्यक्रमाआधीच मंडप भुईसपाट; धरणग्रस्त म्हणतात, हा तर नैसर्गिक न्याय...

मात्र, हानी टळली : धरणग्रस्तांचा होता विरोध

गोमन्तक डिजिटल टीम

A grand pavilion erected for the program collapsed at the base of Salaulim Dam

साळावली धरणाच्या पाण्यातून शेती फुलविलेल्या शेकडो शेतकऱ्यांचा स्वातंत्र्यदिनी सन्मान करण्यासाठी जलस्रोत खात्याने साळावली धरणाच्या पायथ्याशी भव्य मंडप उभारला होता.

मात्र, हा मंडप शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास सरकारी अधिकाऱ्यांच्या समक्षच भुईसपाट झाला. मुळात या कार्यक्रमाला सांगेतील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता.

त्यांचा शाप तर या कार्यक्रमाला लागला नसेल ना, अशा प्रतिक्रिया या दुर्घटनेनंतर उमटू लागल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही.

सविस्तर माहितीनुसार, आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी देशभरातील प्रमुख ७५ धरणांमध्ये साळावलीचा समावेश असल्यामुळे येथे शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी सांगे, केपे व सासष्टी या तीन तालुक्यांतील सुमारे तीनशेहून अधिक शेतकऱ्यांचा गौरव सोहळा आयोजित केला होता.

त्यासाठी एक हजार लोक बसतील अशा क्षमतेचा मंडप उभारला होता, तर पाचशे जणांच्या वरून भोजनाची येथे व्यवस्था केली होती; पण कार्यक्रमाला अवघे दोनच दिवस बाकी असताना ना पाऊस, ना वारा, तरीही मंडप जमीनदोस्त झाला. विशेष म्हणजे, या दुर्घटनेतून कोणताही बोध न घेता जलस्रोत खात्याने परत दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रम घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

हा तर नैसर्गिक न्याय

यासंदर्भात ॲड. आनंद गावकर म्हणाले की, सरकारने धरणग्रस्तांना न्याय दिला नसला तरी धरणग्रस्तांच्या मनाविरुद्ध केल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाचा निषेध करण्यापूर्वीच आम्हाला नैसर्गिक न्याय मिळाला. सामाजिक कार्यकर्ते मिल्टन फर्नांडिस म्हणाले की, ही दुर्घटना जर कार्यक्रम सुरू असताना घडली असती तर त्याची जबाबदारी जलस्रोत खात्याने घेतली असती का?

...अन् बाका प्रसंग टळला

हीच दुर्घटना कार्यक्रम सुरू असताना घडली असती तर मोठा बाका प्रसंग निर्माण झाला असता. या कार्यक्रमाला धरणग्रस्त शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. धरणग्रस्तांचे प्रश्न न सोडविता त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी हा कार्यक्रम येथे करू नका. हा कार्यक्रम रद्द न केल्यास मंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात येतील, असा इशारा ॲड. गावकर यांनी दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT