Subhash Shirodkar Dainik Gomantak
गोवा

Subhash Shirodkar: धरणग्रस्तांच्या त्यागामुळेच गोव्याची तहान पूर्ण - सुभाष शिरोडकर

पुनर्वसित तिळारी विस्थापितांना जमीन मालकीहक्क प्रदान

गोमन्तक डिजिटल टीम

Subhash Shirodkar जमिनी, घरेदारे सोडणाऱ्या तिळारी धरणग्रस्तांचा त्याग मोठा आहे. या विस्थापितांच्या त्यागामुळेच गोव्यातील जनतेची तहान भागत आहे, असे प्रतिपादन जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले आहे.

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या उपस्थितीत पुनर्वसित धरणग्रस्तांना जमीन मालकीहक्क सनदांचे वितरण करण्यात आल्यानंतर मंत्री सुभाष शिरोडकर प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

वसाहत सुंदर आणि स्वच्छ ठेवून लोकांनी आदर्श निर्माण करावा, असे आवाहनही सुभाष शिरोडकर यांनी केले. साळ पुनर्वसन वसाहतीत झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी पुंडलिक खोर्जुवेकर, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, डिचोलीचे मामलेदार राजाराम परब, कार्यकारी अभियंते सालेलकर, जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, साळची सरपंच सावित्री घाडी, दिव्या नाईक अन्य पंचसदस्य आदी उपस्थित होते.

पुनर्वसन वसाहतीतील रस्ते आदी मूलभूत विकासकामे झालेली आहेत. वसाहतीतील जनता आता गोवेकर झाली आहे. या जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण तत्पर राहणार.

असे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सांगून वसाहतीतील जनतेच्या खंबीर सहकार्याची गरज प्रतिपादली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा. धारगळकर यांनी सूत्रसंचालन केले. मामलेदार राजाराम परब यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT