Sadanand shet tanavade sworn as rajyasabha mp  Dainik Gomantak
गोवा

'मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती', नवनिर्वाचित खासदार तानावडे यांची राज्यसभेतून भावनिक पोस्ट

तानावडे राज्यसभेत मराठीतून शपथ घेणारे ते पहिले गोमंतकीय खासदार आहेत.

Pramod Yadav

भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष तसेच नवनिर्वाचित खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सोमवारी (ता.31) दिल्लीतील राज्यसभेत सभापतींसमोर राज्यसभा सदस्यत्वाच्या पदाची व गोपनीयतेची मराठीतून शपथ घेतली.

मराठीतून राज्यसभेत शपथ घेणारे ते पहिले गोमंतकीय खासदार आहेत. गोव्यातून त्यांची राज्यसभा खासदारपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. राज्यसभेत गेलेल्या तानावडे यांनी सभागृहातून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

"एक अविस्मरणीय क्षण, ज्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती, भारतीय जनता पार्टी संघटना कार्यकर्ता म्हणून माझ्या वाटचालीत अनेक वेळा कठोर परिस्थितीला सामोरी जावं लागलं, पण कधीच डगमगलो नाही, कारण माझ्या पाठिशी तुम्हां सर्व कार्यकर्त्यांचा पाठिंबा व आशीर्वाद सदैैव ठाम होता."

"एक एक पाऊल पुढे टाकताना, माझ्या वरिष्ठांकडून आणि कार्यकर्त्यांकडून पाठिंबा आणि सहकार्य सदैव मिळाले , आणि तीच माझी खरी ताकद होती. कार्यकर्ता आणि हितचिंतकांकडून लाभलेल्या पाठींंबाचा मी सदैव ऋणी आहे."

"ज्यांनी मला प्रेरणा दिली, प्रेरित केले आणि मला पक्षाच्या हितासाठी पुढे जाण्यास बळ दिले त्या सर्वांना हा दिवस समर्पित आहे. तुमचा पाठिंबा मला माझ्या नवीन कार्यासाठी नेहमीच प्रेरणा देत राहील. धन्यवाद" अशी पोस्ट सदानंद शेट तानावडे यांनी शेअर केली आहे.

हल्लीच काही दिवसांपूर्वी माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांची मुदत संपल्याने राज्यसभेतील हे पद रिक्त झाले होते.

राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी पंचायतीपासून ते खासदार होईपर्यंत राजकारणात विविध पदे भूषविली आहेत. त्यांनी विधानसभेत थिवीचे आमदार म्हणून पाच वर्षे काम केले आहे. तानावडे यांच्या कामगिरीची दखल घेत भाजपमधील केंद्रातील ज्येष्ठ नेत्यांनी गोव्यातून राज्यसभा खासदारपदासाठी त्यांचे नाव जाहीर केले होते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket: 8 चौकार, 3 षटकार! गोव्याच्या 'तनिषा'ची वादळी खेळी व्यर्थ; आंध्र प्रदेशचा 18 धावांनी विजय

Goa News: 28 गुन्ह्यांचे अपराधीकरण झाले रद्द! गोवा राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; तुरुंगवासाऐवजी दंडाची तरतूद

Nagarjuna At IFFI 2025: '..अजूनही देशात शिवा म्हणूनच हाक मारतात'! अभिनेते नागार्जुन यांचा दिलखुलास संवाद; उलगडला भावनिक प्रवास

मित्र मित्र गेले पोहायला, पाण्याचा अंदाज न आल्याने ओढवले संकट; दूधसागर नदीत बुडालेल्या 15 वर्षीय मुलाचा सापडला मृतदेह

Horoscope: प्रवास, संधी आणि नवीन दिशा! विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्तम; व्यवसायिक लाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT