truck overturn accident in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Truck Crash: चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी! साकोर्डा येथे अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Goa Lllegal Stone Mining : फोंडा तालुक्यातील साकोर्डा येथे कॅनरा बँक जंक्शनजवळ चिरे वाहतूक करणारा एक ट्रक रस्त्याच्या दुभाजकाला धडकून पलटी झाला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

फोंडा: फोंडा तालुक्यातील साकोर्डा येथे कॅनरा बँक जंक्शनजवळ चिरे वाहतूक करणारा एक ट्रक रस्त्याच्या दुभाजकाला धडकून पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा ट्रक मळे–साकोर्डा मार्गे कथित बेकायदेशीर खाणीतून चिरे घेऊन जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

मलपण परिसरातील काही ठिकाणी अजूनही बेकायदेशीररित्या चिरे खाणी सुरू असून तेथूनच हा माल भरून साकोर्डा मार्गे वाहतूक केली जात होती. मलपण–साकोर्डा मार्गावर आरटीओ, पोलिस किंवा अन्य तपासणी यंत्रणांची वर्दळ कमी असल्याने या मार्गाचा वापर केला जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत या मार्गावर सुरू असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

अपघातस्थळाजवळ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा असून दररोज सुमारे ४०० ते ५०० विद्यार्थी या मार्गाने ये-जा करतात. अशा परिस्थितीत चिरे वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती पालक आणि स्थानिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात खनिज विभागाने मलपण परिसरातील कथित बेकायदेशीर खाणींवर छापेमारी केली होती.

नागरिकांचा संताप

बेकायदेशीररीत्या चिरे उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. मलपण गावात अनेक चिरे खाणी असून संबंधित यंत्रणांच्या डोळ्यादेखत हे प्रकार सुरू असतानाही प्रशासन गप्प का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT