खातेदारांची देय रक्कम फेडण्यासाठी माजी सनदी अधिकारी एस. व्ही. नाईक यांची लिक्विडेटर म्हणून सरकारने नियुक्ती केली आहे. Dainik Gomantak
गोवा

Goa: मडगाव अर्बन बँकेवर एस. व्ही. नाईक यांची लिक्विडेटर म्हणून नियुक्ती

मडगाव अर्बन दिवाळखोरीत आल्याने एक महिन्यांपूर्वी आरबीआयने या बँकेचा परवाना रद्द केला होता. आणि राज्य सरकारला पुढील कार्यवाहीसाठी लिक्विडेटर नेमण्याची विनंती केली होती.

दैनिक गोमन्तक

मडगाव: सध्या आर्थिक डबघाईत आलेल्या मडगाव अर्बन बँक (Financially strapped Madgaon Urban Bank) मोडीत काढण्याचा निर्णय यापूर्वीच आरबीआयने (RBI) घेतलेला असताना आता खातेदारांची देय रक्कम फेडण्यासाठी माजी सनदी अधिकारी एस. व्ही. नाईक (Former Chartered Officer S. V. Nike) यांची लिक्विडेटर म्हणून सरकारने नियुक्ती केली आहे.

राज्य सहकार निबंधक अरविंद खुटकर यांनी ही माहिती दिली. नाईक यांनी गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक या पदासह समाज कल्याण खाते तसेच नागरी पुरवठा खात्याच्या संचालक पदासह कित्येक महत्वाची पदे सांभाळली आहेत.

मडगाव अर्बन दिवाळखोरीत आल्याने एक महिन्यांपूर्वी आरबीआयने या बँकेचा परवाना रद्द केला होता. आणि राज्य सरकारला पुढील कार्यवाहीसाठी लिक्विडेटर नेमण्याची विनंती केली होती.

खुटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच दुपारी या नियुक्तीच्या आदेशावर सही झाली असून नाईक हे लवकरच या पदाचा ताबा घेणार आहेत. या बँकेत ज्यांच्या ठेवी आहेत. त्यातील 5 लाखापर्यंतची रक्कम तात्काळ देण्याची तजवीज नव्या कायद्यात असून नाईक हे आता त्यावर कार्यवाही करणार आहेत.

सध्या या बँकेत ठेवीदारांची 192 कोटींची रक्कम अडून पडली असून बँकेकडे सध्या 122 कोटी रोख रकमेच्या रुपात असल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शूटिंगनंतर कुठे गायब झालाय अक्षय खन्ना? 167 कोटींची मालमत्ता असलेला 'रहमान' राहतोय अलिबागमध्ये; स्वर्गाहून सुंदर फार्महाऊस!

Goa Fire: थिवीत 'अग्निकांड', शॉर्ट सर्किटमुळे घराला आग; 5 लाखांचे नुकसान!

Salt Lake Stadium: ममता बॅनर्जींनी मागितली मेस्सीची माफी; मैदानावर घडलेल्या घटनेबाबत व्यक्त केली नाराजी, चौकशी समिती स्थापनेचे आदेश

Goa Nightclub Fire: 'रोमिओ लेन' क्लबचे 18 महिने बेकायदेशीर ऑपरेशन; दिड वर्ष कोणाचेही लक्ष नव्हते?

Goa Live Updates: वागातोर येथील 'CO2 क्लब' सील

SCROLL FOR NEXT