सांकवाळ येथील आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक (Narayan Naik) हल्ला प्रकरणातील संशयित फरार झालेला आरोपी खलील फकिराला (Khalil Fakirala) आज गुरुवारी पहाटे मुरगाव पोलिसांकडून (Murgaon Police) अटक करण्यात आली. नंतर त्याला गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला.
गेल्या ३ जुलै रोजी आरटीआय कार्यकर्ता नारायण नाईक यांच्यावर साकवाळ पंचायतीतुन आपले काम आटोपून आपल्या गाडीकडे जात असताना दोघांनी येऊन लोखंडी रॉडने नाईक यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता व ते तेथून फरार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी तपास कार्य सुरू करून मुख्य संशयित आरोपी करिया याला ताब्यात घेऊन नंतर त्याला अटक करण्यात आली होती. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती मात्र हल्ला प्रकरणातील अजूनही दोन आरोपी फरार होते. नंतर त्या आरोपीविरुद्ध पोलिसाकडून लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती.
दरम्यान इस्माईल शेख (32) आणि खलील फकीर (24) या संशयीता विरोधात पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली होती. पोलीस या दोघांचाही शोध घेत होते. पैकी आज पहाटे मुरगाव पोलिसांनी खलील फकीर याला एलमोंत थिएटर जवळ अटक केली. सदर आरोपी येथील एलमोंत थिएटर जवळ असल्याची माहिती मुरगाव पोलिसांना मिळताच, मुरगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक परेश नाईक, पोलीस कॉन्स्टेबल विवेक नाईक व इतर पोलिसांनी सापळा रचून खलील फकीरला अटक केली. दरम्यान त्याला आज उपजिल्हाधिकारी यांच्या समोर हजर करण्यात आले व नंतर त्याला गुन्हा अन्वेषण विभागाच्या ताब्यात देण्यात आला. पहिला आरोपी यादव हा सध्या कोलवाळ येथे तुरुंगात सजा भोगत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.