Goa NCP MLA Churchill Alemao Dainik Gomantak
गोवा

रॉयला फर्नांडिस यांनी लोकांची दिशाभूल थांबवावी

चर्चिल आलेमाव (NCP MLA Churchill Alemao): खारेबांध-मुंगूल रस्त्याचे काम तूर्तास बंदच

Dainik Gomantak

Goa: पश्चिम बगल रस्त्याचे खारेबांध ते मुंगूल पर्यंतचे अडीज किलोमीटर रस्त्याचे काम तूर्तास बंदच राहणार असल्याने हा प्रकल्प घिसाडघाईने मार्गी लावण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असा खुलासा बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव (NCP MLA Churchill Alemao) यांनी केला. सध्या हे काम बंद ठेवण्यात आले आहे; मात्र बांधकामाचे सामान ठेवण्यासाठी आणि कामगारांना राहण्यासाठी तशी सोय केली जात आहे. तरीही बाणावलीच्या माजी सरपंच रॉयला फर्नांडिस (Royla Fernandes) यांनी लोकांची दिशाभूल चालवली आहे. यातून त्या केवळ लोकांना भडकावून आपली राजकीय पोळी भाजू पाहत आहेत. यातून काहीही साध्य होणार नसल्याने रॉयला यांनी लोकांची दिशाभूल थांबवावी, असे आवाहन आलेमाव यांनी केले.

अडीज किलोमीटरचा रस्ता पाणथळ जागेतून जात असल्याने तो मातीचा भराव घालून न बांधता स्टिल्टवर बांधावा, अशी स्थानिकांची मागणी आहे. ही मागणी आपणही सरकारपुढे मांडली आहे. या मार्गात थोडे बदलही सुचविले आहेत. या सर्वांवर निर्णय घेईपर्यंत हे काम बंदच राहणार याची खात्री लोकांनी बाळगावी, असे आलेमाव म्हणाले.


...तर रॉयला यांना आंदोलनाची गरज नव्हती

खारेबांध ते मुंगूल पर्यंतचा बगल रस्ता मंजूर झाला होता त्यावेळी आपण आमदार नव्हतो तर कायतु सिल्वा हे आमदार होते. त्यावेळी स्वतः रॉयला फर्नांडिस सरपंच होत्या. त्यांनी त्यावेळीच स्टील्टवर हा रस्ता बांधण्याची मागणी त्यांनी केली असती तर आज आंदोलन करण्याची वेळ रॉयला यांच्यावर आली नसती, असे चर्चिल आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT