Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane : राज्यातील शहरांमधील रस्ते सुशोभित आणि ‘ग्रीन हब’वर भर

‘जी-सुडा’ अंतर्गत आढावा बैठकीत चर्चा

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji: राज्यातील शहरांमध्ये सुरू असलेली जी सुडाची कामे तातडीने करण्यासाठीच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असून रस्त्यांचा विस्तार, सुशोभीकरण आणि ग्रीन हब बनवण्यावर आमचे लक्ष असेल, अशी माहिती नगर विकास आणि नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे. जी सुडा अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या सल्लागारांच्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.

मंत्री राणे म्हणाले, आम्ही आज सत्तरी आणि राज्यभर सुरू असलेल्या जी सुडा संबंधित कामांचा आढावा घेतला. या प्रकल्पामध्ये विविध खुल्या जागांची सुधारणा आणि सुशोभीकरण समाविष्ट आहे. याशिवाय रस्त्यांचा विस्तार आणि सुशोभीकरण, शहरांमध्ये ग्रीन हब विकसित करणे, तसेच नगरपालिका क्षेत्रांमध्ये पदपथ उभारणी करणे, यावर लक्ष केंद्रित करत आहोत. दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर आमचा भर आहे. या साधन सुविधांचा कामाचा दर्जा उत्तम ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

प्रकल्प वेळेत पूर्ण करणार

जी सुडा अंतर्गत प्रकल्प वेळेत पूर्ण करावे अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. यासाठी प्रकल्पांसाठीची वेळ निश्चित करून त्याप्रमाणे नियोजन करावे. कामात सातत्य आणि दर्जा राहावा यासाठी सर्वांनी सतर्क राहण्यासही सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aldona: संतापजनक! हळदोण्यात पाळीव कुत्र्याच्या जबड्यावर झाडली गोळी; स्थानिकांची कारवाईची मागणी

Raibandar Fire News: रायबंदरमध्ये आगीचे थैमान! 2 दुचाकी, 4 कार जाळून खाक; लाखोंचे नुकसान

Verca Fire News: वार्का 2 स्कूटरींक उजो, Video

Mhadei River: कर्नाटकचे पितळ उघडे! खोट्या माहितीद्वारे घेतले जागतिक बँकेचे कर्ज! 'म्‍हादई'प्रश्‍नी गोवा सरकार देणार पुरावे

Mhaje Ghar: एक कार्यक्रम, 173 बैठका! ‘माझे घर’साठी भाजपने केले सूक्ष्म नियोजन; लाभार्थ्यांपर्यंत अर्जांसह पोहोचणार कार्यकर्ते

SCROLL FOR NEXT