Road Issue Dainik Gomantak
गोवा

Goa Road Issue: वास्को शहर पणजीच्या मार्गावर! फातोर्ड्यातही डांबरीकरणानंतर खोदाईचे प्रकार

Goa Road Issue: रस्त्यांची वाताहत : खोदकाम सुरूच, अपघाताचा धाेका, मशिनरीमुळेही वाहतुकीला अडथळा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Road Issue: वास्को शहरातील रस्त्यांवरील खोदकामामुळे सध्या वास्कोची स्थिती राजधानी पणजीसारखी झाली आहे. येथील एफ. एल. गोम्स रस्त्यावर जलवाहिनीसाठी केलेले खोदकाम अपूर्ण अवस्थेत आहे. यामुळे पादचारी व वाहन चालकांना बराच त्रास सहन करावा लागतो.

वास्कोत सध्या विविध ठिकाणी रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे. गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागामार्फत स्वतंत्रपथ व एफ. एल. गोम्स रस्त्यावर हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आले होते.

तसेच दोन्ही मुख्य रस्त्यांना जोडणारे दत्तात्रय मार्ग, फा. जोसेफ वाझ रस्त्याचे देखील १५ वर्षांनी हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आले होते.

परंतु गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे. स्वतंत्र पथ मार्गाची फुटपाथ खोदून भूमिगत वीजवाहिनी घालण्यात आली आहे. आता एफ. एल. गोम्स रस्ता खोदून जलवाहिनी घालण्यात येत आहे. मात्र हे काम संबंधित कंत्राटदाराने अर्धवट सोडले आहे.

तसेच वाडे गोवा शिपयार्ड समोरील रस्त्यावर गेल्या तीन महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम पाणी पुरवठा विभागाने खोदकाम करून काम अर्धवट सोडून दिले आहे.

गोवा शिपयार्डच्या मुख्य संरक्षक भिंतीच्या बाजूस रस्त्यावर दोन मोठे खड्डे मारून बांधकाम विभागाने काम अपूर्ण अवस्थेत ठेवले आहे.

मुंडवेल वाडे येथे देखील रस्त्यावर खोदकाम करून गॅस वाहिनीचे काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे. मुंडवेल ते गोवा शिपयार्डपर्यंत खोदकाम करून जलवाहिनी घालण्यात आली, परंतु खोदकाम केलेल्या रस्त्यावर डांबरीकरण केलेले नाही.

आर्लेम सर्कल ते दामोदर सर्कल तसेच आर्लेम सर्कल ते आके येथील वीज खात्याच्या कचेरीकडील सर्कलपर्यंतचा रस्ता एका महिन्यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून डांबरीकरण व हॉटमिक्स केला होता. मात्र आता हे रस्ते खोदायला सुरवात झाल्याने लोकांमध्ये नाराजी पसरली आहे.

रस्त्यांचे डांबरीकरण व हॉटमिक्स करून लगेच खोदले जात आहेत. याला जबाबदार कोण, सरकारी खात्यांमध्ये समन्वय आहे का, असे अनेक प्रश्न लोक उपस्थित करू लागले आहेत.

हे रस्ते एका खासगी कंपनीतर्फे गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी खोदले जात आहेत असे स्थानिक सांगत आहेत. आर्लेम सर्कलकडे जो रस्ता खणलेला आहे तो कित्येक दिवसांपासून तसाच आहे.

आमचा गॅस पाइपलाइन घालण्यासाठी मुळीच विरोध नाही पण या रस्त्याचे डांबरीकरण व हॉटमिक्स करण्यापूर्वी हे काम पूर्ण करायला हवे होते. त्यातच काम अगदी संथगतीने होत आहे.

प्रश्न असा आहे की हे काम संपल्यावर या रस्त्याचे डांबरीकरण व हॉटमिक्स परत एकदा केले जाईल का, असा प्रश्न मंदार सावर्डेकर व प्रमोद नाईक यांनी उपस्थित केला. हे दोघेही आर्लेम फातोर्डा येथील रहिवासी आहेत.

त्यांनी सांगितले की रस्त्यावरच कंपनीने मशिनरी व केबल्स ठेवल्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे.

विशेषता रात्रीच्या वेळी अवजड मशिनरी अंदाज येत नाही, त्यामुळे अपघाताचे प्रसंग उद्‍भवतात. हे काम जी कंपनी करीत आहे त्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी या दोघांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT