Road Construction |Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Road Construction: फोंड्यात मिशन रस्ते चकाचक जोरात!

फोंड्यातील बराच काळ अडून राहिलेले रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण सध्या सुरू झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Road Construction Ponda: फोंड्यातील बराच काळ अडून राहिलेले रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण सध्या सुरू झाले आहे. सांताक्रुझ येथून या हॉटमिक्स डांबरीकरणाला सुरुवात झाली होती. आता खडपाबांधमधील अंतर्गत रस्ते चकाचक करण्यावर भर देण्यात येत आहे.

सुमारे चार कोटी रुपये खर्चून फोंड्यातील या रस्त्यांचे काम जोरात सुरू आहे. शहर व इतर भागातील रस्त्यांची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करून लोकांना स्वच्छ, सुंदर रस्ते उपलब्ध करून देण्याची ग्वाही फोंड्याचे आमदार तथा राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक यांनी दिली.

बुधवारी खडपाबांध-फोंड्यातील अंतर्गत रस्त्यांच्या हॉटमिक्स डांबरीकरणाला कृषीमंत्री रवी नाईक यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी फोंडा नगराध्यक्ष रितेश नाईक तसेच स्थानिक नगरसेवक विलियम आगियार व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

फोंड्यातील रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम बराच काळ रखडल्याने लोकांचे हाल होत होते. शहर परिसरातील मुख्य रस्त्याचे काम हे मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरू असल्याने अडून राहिले आहे.

त्यातच वाहने नादुरुस्त होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असल्याने शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची जोरदार मागणी करण्यात येत होती. ती आता लवकरच पूर्ण होणार आहे.

मलनिस्सारण प्रकल्पामुळे काम अडले

फोंड्यातील मलनिस्सारण प्रकल्पाच्या कामामुळे रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम अडले होते. आता मलनिस्सारण प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येत असून नजीकच्या काळात या प्रकल्पाची जोडणीही ग्राहकांना देण्यात येणार आहे. त्यामुळे स्वच्छ, सुंदर फोंड्याची कल्पना मूर्त रूपात येईल, असे नागरिकांनी सांगितले.

ई-वेस्ट कचरा मोहिमेस प्रारंभ!

फोंडा लायन्स क्लबतर्फे हिलदारी यांच्या सहकार्याने फोंडा पालिका क्षेत्रात ई-वेस्ट कचरा संकलन मोहीम सुरू करण्यात आली आहे. येत्या 14 फेब्रुवारीपर्यंत फोंडावासीयांनी आपल्या घरातील ई-वेस्ट कचरा अर्थातच टाकाऊ टिव्ही, कॉम्प्युटर तसेच इतर साहित्य ढवळी येथील पंकज कॉर्पोरेशनमध्ये आणून द्यावे, असे आवाहन फोंडा नगराध्यक्ष रितेश नाईक तसेच लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT