Pernem : Flooded road at Chandel - Pernem Goa. Dainik Gomantak
गोवा

Goa : चांदेल येथील रस्‍ता पाण्‍याखाली, वाहतूक बंद

आठवडाभरात दुसरी घटना : ‘तिळारी’च्‍या पाण्‍याची लोकांनी घेतली धास्‍ती Goa

Mahesh Tandel, prakash talavnekar

पेडणे : गेल्‍या बारा दिवसांपासून सुरू असलेल्‍या संततधार पावसामुळे (Heavy Rain) चांदेल येथे गुरुवारी सायं. ४.३० वा.च्‍या सुमारास रस्‍ता पाण्‍याखाली (Road under water) गेला आणि वाहतुकीसाठी बंद झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने (Vehicals) अडकून पडली होती. हा रस्ता या पंधरवड्यात पाण्याखाली जाण्याची दुसरी घटना आहे. १४ रोजी सायं. ७.३० वा.च्‍या सुमारास हा रस्ता पाण्याखाली गेला होता, तर गेल्या दोन वर्षी पावसाळ्यात तिळारी धरणाचे (Tilari Dam) पाणी अचानक नदीत सोडल्याने नदी, नाल्‍यांना पूर आल्‍याने लोकांची तारांबळ उडाली होती.

लोकांच्या घरात पुराचे (flood) पाणी शिरल्‍याने नुकसान झाले. तसेच शेती, बागायतींची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली होती. आता पुन्‍हा पाण्याची पातळी वाढू लागल्‍याने पुराचे पाणी तिळारी धरणातून सोडले नाही ना? अशी भिती स्‍थानिकांकडून व्‍यक्‍त केली जात आहे. दरम्‍यान, तिळारी धरण सूत्रांशी संपर्क साधला असता धरणाचे पाणी अद्याप सोडण्यात आले नसल्याचे सांगितले. यापूर्वी तिळारीचे पाणी सोडल्याने पुराचा फटका बसलेल्या इब्रामपुर गावातील लोकांशी संपर्क साधला असता, त्यांनी नदीच्या पाण्याची पातळी वाढली नसल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT