Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: दर 21 तासांनी 1 बळी, रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले! मागच्‍या 10 दिवसांत 11 जणांचा मृत्‍यू

Accident Death Rate Goa: राज्‍यात अपघातांचे सत्र सुरूच असून मागच्‍या दहा दिवसांत तब्‍बल ११ जणांचे बळी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्‍यात दर ३१व्‍या तासाला वाहन अपघातात एकाचा मृत्‍यू व्‍हायचा, मात्र आता हे प्रमाण २१ तासांवर आले आहे.

Sameer Amunekar

मडगाव: राज्‍यात अपघातांचे सत्र सुरूच असून मागच्‍या दहा दिवसांत तब्‍बल ११ जणांचे बळी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्‍यात दर ३१व्‍या तासाला वाहन अपघातात एकाचा मृत्‍यू व्‍हायचा, मात्र आता हे प्रमाण २१ तासांवर आले आहे. त्‍यामुळे रस्‍तासुरक्षेबाबत राज्‍यातील स्‍थिती नियंत्रणाबाहेर चालली आहे असे वाटू लागले आहे.

२३ मे ते १ जून या दहा दिवसांत दुचाकी आणि अन्‍य वाहनांच्‍या अपघातात मृत्‍यू पावलेल्‍यांची संख्‍या ७ तर वाहनांची धडक बसून मृत पावलेल्‍या पादचाऱ्यांची संख्‍या ४ एवढी आहे. १ जानेवारी ते १ जून या १५२ दिवसांच्‍या कालावधीत ११७ जणांचा रस्‍तेअपघातांत बळी गेला आहे.

याबाबत प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना, सुरक्षा व्‍यवस्‍थापनातील ज्‍येष्‍ठ तज्‍ज्ञ अवधूत कुंकळयेकर म्‍हणाले की, गोवा संघप्रदेश होता त्‍यावेळी तत्‍कालीन नायब राज्‍यपाल गोपाल सिंग यांनी गोव्‍यातील अपघाती मृत्‍यूंचे प्रमाण पाहून ‘गोवा हे किलर स्‍टेट’ अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली होती. आता पुन्‍हा एकदा गोव्‍यात तीच स्‍थिती निर्माण होऊ लागली आहे असे वाटते.

दरम्‍यान, मागच्‍या वर्षी म्‍हणजे २०२४ साली राज्‍यात तब्‍बल २६८२ रस्‍ते अपघातांत २८६ जणांना मृत्‍यू आला होता. मात्र यंदा पहिल्‍या पाच महिन्‍यांतच बळींची संख्‍या ११५ वर पोहोचली आहे.

मागच्‍या दहा दिवसांतील अपघाती मृत्‍यू

२३ मे : आपल्‍या कुत्र्याला घेऊन रस्‍त्‍यावर उभी असलेल्‍या राणी बिंद या ३५ वर्षीय युवतीला चिखली येथे कारची धडक बसल्‍याने ती गंभीर जखमी. गोमेकॉत उपचार सुरू असताना १ जूनच्‍या पहाटे मृत्‍यू.

२४ मे : रस्‍त्‍यावर कुत्रा आडवा आल्‍याने नावेली येथे झालेल्‍या दुचाकी अपघातात मागे बसलेले रमेश फडते (७०) हे गंभीर जखमी. उपचार सुरू असताना १ जून रोजी मृत्‍यू.

२४ मे : केरी-फोंडा येथे दुचाकीच्‍या स्‍वयंअपघातात कृष्‍णा जल्‍मी यांचा मृत्‍यू.

२५ मे : कुंकळ्‍ळी येथे झालेल्‍या स्‍वयंअपघातात महमद फझलू या १९ वर्षीय युवकाचा मृत्‍यू.

२७ मे : म्‍हापसा येथे रस्‍ता ओलांडत असताना आकांक्षा बोरो या १२ वर्षीय मुलीला दुचाकीची धडक बसल्‍याने मृत्‍यू.

२८ मे : दाबोळी येथे उड्डाणपुलासाठी खणलेल्‍या खड्ड्यात दुचाकी पडल्‍याने मारुती जाधव (४५) यांचा बळी.

२९ मे : पर्वरी येथे इव्‍ही स्‍कूटरला ट्रकची धडक बसल्‍याने गोपाळ प्रसाद (६८) या मूळ उत्तरप्रदेश येथील ज्‍येष्‍ठ नागरिकाचा मृत्‍यू.

३० मे : कोलवा सर्कलजवळ रस्‍ता ओलांडत असताना बसची धडक बसल्‍याने जोसेफ बाप्‍तिस्‍ता (६७) हा पादचारी ठार.

३१ मे : वेर्णा येथे रस्‍ता ओलांडत असताना भरधाव कारची धडक बसल्‍याने अनिशा बोरकर (२३) या युवतीचा मृत्‍यू तर अन्‍य एक युवती गंभीर जखमी.

१ जून : तीन वाहनांच्‍या अपघातात कारची दुचाकीला धडक बसल्‍याने मष्‍णू गौडा (३५) या मूळ कर्नाटकच्‍या युवकाचा कुळे येथे मृत्‍यू.

१ जून : कोरगाव-पेडणे येथे रस्‍ता ओलांडत असताना वाहनाची धडक बसल्‍याने चंद्रशेखर शेट्ये (५६) हा पादचारी ठार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT