IIT Project  Dainik Gomantak
गोवा

IIT Project साठी रिवणच्या सुपीक कुळागरांवर सरकारचा डोळा, झाडांवर केलेय मार्किंग, बागायतदार आक्रमक

गोमन्तक डिजिटल टीम

IIT Project शेती-बागायती असलेल्या जमिनीत आयआयटीचा अवाढव्‍य प्रकल्‍प नको, असे स्थानिकांनी ठणकावून सांगितल्यामुळे यापूर्वी निश्‍चित केलेल्‍या तीन जागा सरकारला सोडाव्‍या लागल्‍या. तरीही यातून सरकारने काहीच बोध घेतलेला दिसत नाही.

या प्रकल्‍पासाठी रिवण पंचायत क्षेत्रातील मळे येथील सुमारे सहा लाख चौ.मी. जमीन सरकारने हेरली आहे. मात्र, त्‍यातील सुमारे दोन लाख चौ.मी. जमीन ही सुपीक कुळागारांची असल्‍याने या नियोजित प्रक़ल्‍पाला पुन्‍हा एकदा स्‍थानिक बागायतदारांकडून विरोध होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

रिवण बाजारापासून सुमारे सात कि.मी. अंतरावरील मळे गावात या प्रक़ल्‍पासाठी जागा निश्‍चित केल्याचे सांगण्‍यात येते.

ही नियोजित जमीन पूर्वी या भागात ज्‍या दोन खाणी होत्‍या, तिथून जवळच आहे. या जमिनीच्‍या अलीकडे मळे हा गाव असून येथे प्रत्‍यक्ष पाहणी केली असता, या गावातील लोक या प्रकल्‍पाबद्दल प्रसार माध्‍यमांना फारशी माहिती देण्‍यास उत्‍सुक नाहीत, असे दिसून आले.

सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, या प्रकल्‍पाला या भागातील बागायतदारांकडून विरोध होणार असून दोन बागायतदारांनी न्‍यायालयातही जाण्‍याची तयारी सुरू केल्‍याची माहिती मिळाली.

यापूर्वी आयआयटीचा प्रकल्‍प सत्तरी आणि त्‍यानंतर कोटार्ली-सांगे येथे उभारण्‍याचे निश्‍चित केले होते. मात्र, दोन्‍ही ठिकाणी शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन केल्‍यामुळे सरकारला नमते घ्‍यावे लागले होते.

आता पुन्‍हा एकदा बागायत असलेलीच जमीन या प्रकल्‍पासाठी शोधली आहे. त्‍यामुळे सरकार आणि बागायतदार यांच्‍यातील संघर्ष पुन्‍हा एकदा उफाळून येणार आहे.

झाडांवर मार्किंग

एक महिन्‍यापूर्वी या बागायतीतील माड व पोफळीच्‍या झाडांवर क्रमांक टाकले होते. भविष्‍यात ही झाडे कापण्‍यासाठीच झाडांवर मार्किंग केले असावे, असा तर्क व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे. ही जमीन मालकाकडून मिळविण्‍यासाठी काही स्‍थानिक राजकारणी मध्‍यस्‍थ म्‍हणून काम करत आहेत.

त्‍यातील एका राजकारण्‍याला जर हा प्रकल्‍प या जागेत आला तर तिथे सुरक्षा रक्षक नेमण्‍याची एजन्‍सी देण्‍यात येईल, असे आश्‍वासन मिळाले आहे. मात्र, ही जमीन विकत घेण्‍यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT