Pernem Excise Scam: अबकारी खात्यात झालेला आर्थिक घोटाळा हा त्या खात्याचे संगणकीकरण रखडवल्यामुळेच झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. सध्या दक्षता खात्याकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
खात्याच्या पेडणे येथील कार्यालयात परवाने नूतनीकरण शुल्क जमा करण्यात आले, मात्र ते सरकारी कोषागारात जमा करण्यात आले नाही असा आरोप आहे.
म्हापशातील राजकीय कार्यकर्ते संजय बर्डे हे या विषयाचा पाठपुरावा करत आहेत.
या प्रकरणी सरकारने कोणतीही पोलिस तक्रार नोंदविलेली नाही. बर्डे यांनी दिलेली तक्रारही नोंदवून घेण्यात आलेली नाही. हा घोटाळा कसा आकाराला आला याविषयी प्रथम चौकशी करण्यात आली आहे.
त्यातून संगणकीकरण न झाल्याने घोटाळा करणे शक्य झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या पंचायत सचिव असलेले मिनिनो डिसोझा हे अबकारी आयुक्त असताना त्यांनी खात्याच्या संगणकीकरणावर भर दिला होता.
खात्यात येणाऱ्या प्रत्येक महसुलाची नोंद संगणकीय प्रणालीत व्हावी अशी व्यवस्था त्या काळात कऱण्यात आली होती.
आता त्या पैशांची वसुली खात्याकडून केली गेली असली तरी ते प्रकरण मिटलेले नाही. हा घोटाळा करण्यासाठी संगणकीकरण मुद्दामहून रखडवले होते की रखडलेल्या संगणकीकरणाचा फायदा घेण्यात आला याची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तत्कालीन अबकारी आयुक्त मिनिनो डिसोझा यांच्या कार्यकाळात मद्यउत्पादक कंपन्या आणि व्यापार करणाऱ्या कंपन्यांच्या व्यवहारांच्या बाबतीत संगणकीकरण पूर्ण करण्यात आले होते.
मद्यांची घाऊक व किरकोळ विक्री करणारी दुकाने, बार ॲण्ड रेस्टॉरंट्सचे अबकारी परवाने नूतनीकरणासाठी संगणकीकरण आवश्यक असताना डिसोझा हे भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर ते काम थंडावले.
हीच संधी साधून ऑनलाईन नाही तर ऑफलाईन पद्धतीने शुल्क स्वीकारतो असे सांगून शुल्क जमा करण्यात आले व ते सरकारी कोषागारात भरलेच गेले नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.