Goa River Navigation Department  Dainik Gomantak
गोवा

Goa River Navigation Department : नदी परिवहन खात्यातील घोटाळे उघड; लाखोंचा गफला करूनही रोखपाल कामावर

ऑडिट तपासणीत ‘कॅग’ला कॅश बूकमध्ये मोठी अनियमितता आढळली.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji : अबकारी खात्यातील नुकताच एक घोटाळा पुढे आल्यानंतर आता नदी परिवहन खात्यातील अनागोंदी चव्हाट्यावर आली आहे. दोन वर्षांपूर्वी नदी परिवहन खात्यातील बेती येथील लेखा विभागात कॅश बूक न ठेवल्याबद्दल आणि सुमारे सव्वातीन लाखांचा गफला केल्याबद्दल निलंबित केलेल्या रोखपाल महिलेची चौकशी न करताच तिला पुन्हा कामावर घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

शिवाय महालेखापालांच्या (कॅग) 2021-22 सालच्या तपासणी अहवालात कॅश बूकमध्ये 11.03 लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. लागोपाठ दोन घोटाळे घडूनही त्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न खाते का करत नाही? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

2021-22 च्या ऑडिट तपासणीत ‘कॅग’ला कॅश बूकमध्ये मोठी अनियमितता आढळली. तेथे 11 लाख रुपये गहाळ झाले आहेत. नदी परिवहनने संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केल्याचे सांगत बचावाचा प्रयत्न केला.

यापूर्वीच्या प्रकरणावरही पांघरूण

डिसेंबर 2021 मध्ये, कॅप्टन ऑफ पोर्टचे तत्कालीन कॅप्टन जेम्स ब्रागांझा यांनी 2018 ते 2020 दरम्यान कॅश बुक व्यवस्थित न ठेवल्याबद्दल रोखपालाला निलंबित केले होते. विसंगती आणि अनियमिततेच्या आधारे, ब्रॅगांझा यांनी रोखपालावर सरकारी पैशाच्या गैरव्यवहारात सहभाग असल्याचा आरोप केला होता, परंतु आजपर्यंत त्या प्रकरणाचाही तपास झालेला नाही.

चौकशी करण्याची सचिवांची ग्वाही

या खात्याचे सचिव डॉ. व्ही. कंडावेलू यांच्याकडे ‘गोमन्तक’ने विचारणा केली असता, आम्ही हे प्रकरण तपासून पाहतो, असे सांगितले. विशेष म्हणजे महालेखापालांनी 9 मे 2023 रोजी सचिव, बंदर कप्तान खात्याचे कॅप्टन यांना कॅश बूकमधील 11.03 लाखांच्या गफला प्रकरणाविषयी पूर्ण सूचित केले होते. त्याशिवाय चार आठवड्यांत कॅश बूकमधील सर्व पावत्यांची माहिती सादर करण्यासही महालेखापालांनी सचिवांना कळविले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारताची अणुऊर्जेत मोठी झेप! कल्पक्कममध्ये 'फास्ट ब्रीडर रिएक्टर' यशस्वी, PM मोदींकडून अभिनंदन; होमी भाभांचे स्वप्न साकार

Supreme Court: रागाच्या भरात दिलेली शिवी गुन्हा ठरणार नाही! 'बास्टर्ड' शब्दावरुन झालेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने केली रद्द; नेमकं प्रकरण काय?

Cricket Record: दोन दिग्गज, एक संघ, दशकांचा काळ! 90 टेस्ट आणि 307 वनडे सामने एकत्र खेळले; पण 'या' बहाद्दरांची जोडी बॅटिंगसाठी कधीच जमली नाही

इशानचा 'ड्रग्‍स कॉकटेल' मुळेच मृत्‍यू, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा! शरीरात 5 अमलीपदार्थांचे अंश

Air India Ticket Price Hike: एअर इंडियाचा 'हाय व्होल्टेज' झटका! 8 एप्रिलपासून विमान प्रवास महागणार, फ्यूल सरचार्जमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या किती वाढले भाडे

SCROLL FOR NEXT