Goa: River  Dainik Gomantak
गोवा

Goa: डिचोलीत पर्जन्यवृष्टीनंतर नद्यांची पातळी स्थिर

पर्जन्यवृष्टीमुळे सकाळी सर्वत्र हा:हाकार माजला असतानाच, दुपारी पावसाचा जोर कमी झाल्याने डिचोलीत (Bicholim) परिस्थिती तूर्तास नियंत्रणात आहे.

दैनिक गोमन्तक

पर्जन्यवृष्टीमुळे सकाळी सर्वत्र हा:हाकार माजला असतानाच, दुपारी पावसाचा जोर कमी झाल्याने डिचोलीत (Bicholim) परिस्थिती तूर्तास नियंत्रणात आहे. दुपारी पावसाचा जोर कमी झाला असला, तरी आकाशात ढगांची दाटी कायम आहे. त्यामुळे तूर्तास धोका टळला असला, तरी पुन्हा पावसाची कोसळधार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोसळधार पावसामुळे मंगळवारी सकाळी डिचोलीत दोन ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळली.

नद्यांची पातळी नियंत्रणात

काल सकाळी पावसाने रौद्रावतार धारण केल्यानंतर नदीनाल्यांतील पाण्याची अचानक होती. डिचोली नदीसह साखळीतून वाहणाऱ्या वाळवंटी नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. डिचोली नदीसह साखळीतील वाळवंटी नदीचे पाणी बाहेर फुटले होते. नदीकाठी जलमय स्थिती झाली होती. जलस्रोत खात्यातर्फे डिचोली आणि साखळीत नदीकाठी पम्पिंग सुरु करण्यात आले. सोमवारी दुपारपर्यंतची परिस्थिती डिचोलीत पुराचा तडाखा बसतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच, दुपारी पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांची पातळी ओसरू लागली.

सोमवारी सायंकाळपर्यंत नद्यांची पातळी पूर्णपणे नियंत्रणात आली. काल रात्री पावसाने पुन्हा जोर धरला. मंगळवारी सकाळपासून ते दुपारपर्यंत मुसळधार पावसाने सर्वत्र झोडपून काढले. त्यामुळे नद्यांची पातळी पुन्हा वाढण्याची भिती निर्माण झाली होती. मात्र दुपारपर्यंत पाण्याची पातळी नियंत्रणात होती. सोमवारी दुपारपर्यंत डिचोली नदीच्या पाण्याची पातळी 3.6 तर साखळीतील वाळवंटी 3 मीटरहून अधिक झाली होती. पावसाचा जोर उतरल्यानंतर डिचोली नदीची पातळी 3.3 तर साखळी नदीची पातळी 2.3 मीटरपर्यंत खाली आली होती. मंगळवारी मुसळधार पाऊस पडूनही दुपारपर्यंत नद्यांच्या पातळीत विशेष वाढ झाली नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT