Goa COVID-19 Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: गोव्यात आज 18 नव्या कोरोना रूग्णांची नोंद; 23 डिस्चार्ज

राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 98.42 टक्के एवढा झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Corona Update: गोव्यात आज (बुधवारी) दिवसभरात 18 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली असून, 23 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रूग्णसंख्या कमी झाली असून, सध्याच्या घडीला 76 अॅक्टिव्ह कोरोना रूग्णांवर (Active Corona Cases in Goa) उपचार सुरू आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 98.42 टक्के एवढा झाला आहे.

गोवा आरोग्य विभागाच्या (Goa Health Department) वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजवर 2 लाख 58 हजार 653 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 54 हजार 564 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजवर राज्यात 4,013 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 995 प्रयोगशाळा नमूने तपासण्यात आले आहेत.

देशात 20,821 सक्रिय कोरोना रूग्ण

भारतात सध्याच्या घडीला 20,821 सक्रिय कोरोना रूग्णांवर (Active Corona Cases) उपचार सुरू आहेत. गेल्या चोवीस तासांत 1,112 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली असून, 1,892 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट 98.77 टक्के एवढा आहे. देशात आजवर 219.58 कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. त्यापैकी, 95.01 कोटी नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर, 22.05 कोटी नागरिकांनी सुरक्षात्मक डोस घेतले आहेत. (Covid-19 Cases in India)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT