Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: गोव्यात दोन दिवसांत 14 रूग्णांची नोंद, 21 जणांना डिस्चार्ज

राज्यात सध्याच्या घडीला राज्यात 62 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Corona Update: गोव्यातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावला असून, मागील दोन दिवसांत 14 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आज सात रूग्णांची वाढ झाली आहे. तसेच, दोन दिवसांत 21 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली असून, सध्याच्या घडीला राज्यात 62 सक्रिय कोरोना रूग्णांवर (Active Corona Cases in Goa) उपचार सुरू आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 98.43 टक्के एवढा झाला आहे.

गोवा आरोग्य विभागाच्या (Goa Health Department) वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजवर 2 लाख 58 हजार 930 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 54 हजार 855 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजवर राज्यात 4,013 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 630 प्रयोगशाळा नमूने तपासण्यात आले आहेत.

गोव्यात कोरोना संसर्गाचे वेग मंदावला असून, नव्याने वाढ होणाऱ्या रूग्णांची संख्या कमी झाली आहे. यासह बरे होणाऱ्या रूग्णांची संख्येत वाढ झाल्याने सक्रिय रूग्णसंख्या देखील कमी झाली आहे. तसेच, देशातील देखील सक्रिय रूग्णांच्या संख्येत देखील मोठी घट झाली असून, सध्याच्या घडीला देशात भारतात सध्याच्या घडीला 9,468 सक्रिय कोरोना रूग्णांवर (Active Corona Cases) उपचार सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT