AIDS Dainik Gomantak
गोवा

AIDS Cases In Goa: गोव्यासाठी धोक्याची घंटा! राज्यात एड्स बधितांमध्ये 7 टक्क्यांहून अधिक वाढ

2023 मध्ये 260 नवीन एचआयव्ही सकारात्मक रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या 2022 च्या तुलनेत 7 टक्क्यांहून अधिक आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

AIDS Cases In Goa

आरोग्य खाते एकीकडे अधिक प्रगती करत असताना राज्यातील एचआयव्ही रुग्णांची संख्या चिंताजनक बनली आहे. आरोग्य खाते एकीकडे अधिक प्रगती करत असताना राज्यातील एचआयव्ही रुग्णांची संख्या चिंताजनक बनली आहे. 2023 मध्ये 260 नवीन एचआयव्ही सकारात्मक रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या 2022 च्या तुलनेत 7 टक्क्यांहून अधिक आहे.

गोवा एड्स नियंत्रण सोसायटीच्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये राज्यात एकूण 242 एचआयव्ही रुग्ण होते. यामध्ये 60 टक्क्यांहून हून अधिक रुग्ण बार्देश, सासष्टी, तिसवाडी आणि मुरगाव या चार तालुक्यांमधील होते.

तर 2023 मध्ये राज्यात एड्सची 21 प्रकरणे नोंदवली गेली असून यामुळे 32 जणांचा मृत्यू झाला आहे. बार्देश तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 52 एचआयव्ही सकारात्मक रुग्ण आढळून आले असून सासष्टीमध्ये 39 तर तिसवाडीत 38 प्रकरणे आहेत. यातील महत्त्वाची बाब म्हणजे 70 टक्के रुग्ण हे 25-49 या वयोगटातील आहेत.

यामध्ये वर्षभरातील आकडेवारीतील 97.7 टक्के संक्रमण हे असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे झाले असून 1.5 टक्के संक्रमण हे आनुवंशिकतेमुळे झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT