लुइझिन फालेरो Dainik Gomantak
गोवा

Goa: 35 हजार कोटी रुपयांची खनिज लूट वसूल करा

लुईझीनची राज्यसभेत मागणी: पर्यावरण विध्वंसक प्रकल्प आणत असल्याची भाजपवर (BJP) आरोप

दैनिक गोमन्तक

मडगाव: राज्यसभेचे (Rajya Sabha) सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तृणमूल काँग्रेसचे खासदार लुइझिन फालेरो यांनी आज आपल्या पहिल्या भाषणात गोव्यातील सत्ताधारी भाजप (BJP) सरकारवर जोरदार हल्ला चढवला. गोव्यात खाण बंदीमुळे लोक त्रासात पडले असून खाण कंपन्यानी बेकायदेशीर खनिज उत्खनन करून जी 35 हजार कोटी रुपयांची लूट केली आहे ती वसूल करा अशी मागणी केली.

गोवा-केंद्रित मुद्दे संसदेत मांडण्याचे आपले वचन पाळत, नवनिर्वाचित राज्यसभेच्या खासदाराने कोळसा वाहतूक आणि तीन वादग्रस्त प्रकल्पांना विरोध करत हे तिन्ही प्रकल्प 'कार्डिनल सिन्स' असे प्रतिपादन केले.

कामकाजाच्या दरम्यान, फालेरो यांनी म्हादईचे पाणी कर्नाटककडे (Karnataka) वळविण्याच्या मुद्द्यावरही प्रकाश टाकला. सध्या ओल्ड गोवा येथे जे वादग्रस्त बांधकाम उभे झाले आहे त्याकडे लक्ष वेधीत 'युनेस्को'ने संरक्षित दर्जा दिलेल्या जुन्या वारसा स्थळांचा नाश करण्यासाठी भाजप पुढे सरसावला आहे असा आरोप केला.

गोमंतकीयांना त्यांच्या पर्यावरणाचा(environment) अत्यंत आदर आहे, असे सांगून आपल्या ज्वलंत भाषणाला सुरुवात करताना फालेरो यांनी प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर निशाणा साधला आणि ते म्हणाले, 'गोवा सरकारने जे तीन मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत, ज्यांनी केवळ पर्यावरणाचा नाशच केला नाही तर पर्यावरण आणि गोव्यातील लोकांचे जीवनमान उद्ध्वस्त केले आहे. भाजप सरकारने 13 दशलक्ष टन कोळसा गोव्यातून कर्नाटकात नेण्यासाठी करार केला आहे. गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे, कोळशाचे केंद्र ठिकाण नाही. हे आरोग्यासाठी धोकादायक आहे आणि गोमंतकीयांना याचा त्रास होत आहे असे त्यांनी सांगितले.

राज्यातील खाणी पुन्हा सुरू करण्याची सरकारकडे मागणी करून फालेरो पुढे म्हणाले, ‘खाण क्षेत्र हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. एकापाठोपाठ आलेल्या सरकारांनी खाणकाम बंद केले आहे ज्याचा परिणाम सुमारे अडीच लाख लोक आता रस्त्यावर आलेले आहेत.

वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या तीन रेषीय प्रकल्पांबद्दल बोलताना फालेरो म्हणाले की, रेल्वे (Railway) ट्रॅकचे दुहेरीकरण, राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण आणि तमनार वीज प्रकल्पांनी गोव्याची नाजूक पर्यावरण व्यवस्था नष्ट केली आहे. ‘रेषीय प्रकल्प हे गोव्यातील लोकांवर लादलेले तीन प्रमुख पापे आहेत. ते प्रामुख्याने कोळसा गोव्यातून अंतर्गत भागात नेण्याचा प्रस्ताव होता. यामुळे केवळ आमची जंगलेच नाही तर गोव्याचे अभयारण्य असलेल्या वन्यजीव अभयारण्यांचाही नाश झाला आहे,’ असे फालेरो म्हणाले.

लुईझिन फालेरो यांनी पुढे म्हादईचे पाणी कर्नाटककडे वळविण्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, की गोवा नद्यांची पूजा करतो पण गोव्याची जीवनरेखा असलेल्या म्हादईचे पाणी कर्नाटकात वळवण्यात आले आहे. हे पाणी वळवण्यामुळे गोव्यातील पर्यावरण आणि पर्यावरणाचा नाश झाला आहे असा दावा त्यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT