Goa protests and criminal cases Dainik Gomantak
गोवा

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

Goa Protest Cases: गोव्यात २०२१ ते २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीत एकूण ४२ आंदोलने व निदर्शने झाल्याची माहिती गृह खात्यातील सूत्रांनी दिली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्यात २०२१ ते २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीत एकूण ४२ आंदोलने व निदर्शने झाल्याची माहिती गृह खात्यातील सूत्रांनी दिली. या कालावधीत आंदोलनांची संख्या सातवरून १५ वर पोहोचली असून २०२५ मध्ये पाच वर्षांतील सर्वाधिक आंदोलने झाल्याचे सरकारी आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये सात, २०२२ मध्ये पाच, २०२३ मध्ये सहा, २०२४ मध्ये नऊ आणि २०२५ मध्ये १५ आंदोलने झाली. त्यामुळे २०२२च्या तुलनेत २०२५ मध्ये आंदोलनांची संख्या तिप्पट झाली आहे. २०२१च्या तुलनेतही २०२५ मधील आंदोलने दुपटीहून अधिक आहेत.

दरम्यान, जानेवारी २०२२ ते जुलै २०२६ या कालावधीत आंदोलनांच्या संदर्भात १६ प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आल्याची माहितीही सरकारने दिली. त्यात २०२२ मध्ये एक, २०२३ मध्ये दोन, २०२४ मध्ये सात, २०२५ मध्ये दोन आणि जुलै २०२६ पर्यंत चार ‘एफआयआर’चा समावेश आहे. या आकडेवारीनुसार, २०२४ हे आंदोलनांशी संबंधित गुन्हे दाखल होण्याच्या दृष्टीने सर्वाधिक ठरले.

आंदोलनांशी संबंधित प्रकरणांमध्ये पोलिसांची परवानगी न घेता निदर्शने करणे, बेकायदा जमाव करणे तसेच सार्वजनिक रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा निर्माण करणे यांसारख्या आरोपांचा समावेश असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

२०२१ ते २०२५ या स्वतंत्र कालावधीसाठी सरकारने आंदोलनांशी संबंधित १५ ‘एफआयआर’ची माहिती दिली आहे. त्यानुसार २०२१ मध्ये दोन, २०२२ मध्ये एक, २०२३ मध्ये दोन, २०२४ मध्ये सात आणि २०२५ मध्ये तीन गुन्हे दाखल झाले. काही प्रकरणे नंतर मागे घेण्यात आल्याचेही सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

पोलिस कारवाईत वाढ

आंदोलनांशी संबंधित ‘एफआयआर’ची माहिती दिली तरी संबंधित व्यक्तींची नावे ही प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देत दिलेली नाहीत. या आकडेवारीतून राज्यातील आंदोलनांची वाढती संख्या व त्यासोबत आंदोलनांशी संबंधित पोलिस कारवाईत वाढ अधोरेखित झाली आहे. २०२५ मध्ये आंदोलने सर्वाधिक झाली, तर २०२४ मध्ये आंदोलनांशी संबंधित सर्वाधिक ७ ‘एफआयआर’ दाखल झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT