Goa Temperature Dainik Gomantak
गोवा

Goa Temperature: गोव्यात सोमवारी नोंदवले गेले देशातील सर्वाधिक तापमान

फेब्रुवारीतील तापमानाने नोंदवला नवा विक्रम, आजही नोंदले गेले विक्रमी तापमान

Akshay Nirmale

Goa Temperature: एप्रिल मे मधला अर्थात वैशाख वणवा सर्वज्ञात आहे, तो असह्य उन्हाळा आपण अनुभवला असेलच. मात्र, आता फेब्रुवारीमध्येही हीच स्थिती निर्माण होत असून तापमान चाळीसीकडे जात असल्याची नोंद आहे.

सोमवारी 13 फेब्रुवारी रोजी गोव्यातला पारा 37.9 डिग्री सेल्सिअसवर पोहोचला होता. हे तापमान देशातील सर्वाधिक तापमान होते.

त्यामुळे आता एप्रिल, मे बरोबर फेब्रुवारीही 'हॉटेस्ट'अर्थात फाल्गुन वणवा म्हणावा लागत आहे. तशा नोंदी हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेत झाल्या आहेत.

हवामान खात्याचे शास्त्रज्ञ राहुल एम. यांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारीमध्ये होणारे तापमानातील बदल ही तशी दुर्मिळ घटना नाही. यापूर्वीही फेब्रुवारीचे तापमान वाढले होते. मात्र ही आत्तापर्यंतची सर्वाधिक तापमान वाढीची तिसरी घटना आहे.

सोमवारी 13 फेब्रुवारी रोजी गोव्याचे तापमान 37.8 अंश होते. फेब्रुवारी महिन्यामध्ये पूर्वेकडून जमिनीवरून येणारे वारे तापमान वाढीस कारणीभूत ठरते. अर्थात याला समुद्रावरून येणारे वारे उशिरा वहायला सुरू होणे हेही कारण आहे.

जसे की सोमवारी समुद्रावरून येणारे वारे दुपारी 3 वाजता वाहू लागले. याउलट पूर्वेकडून जमिनीवरून येणाऱ्या वाऱ्याचा वेग जास्त होता. आणि हे वारे जमिनीवरून आल्याने उष्ण होते. त्यामुळे या तापमानात वाढ झाली होती, आजची ही परिस्थिती तीच आहे.

आजही नोंदले गेले विक्रमी तापमान

गोव्यात आज 38.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंदणी झाली. ही फेब्रुवारीतील आतापर्यंतच्या तापमानातली सर्वाधिक विक्रमी नोंद आहे, अशी माहिती एम. राहुल यांनी दिली आहे. सर्वसाधारणपणे समुद्रावरून येणारे वारे पहाटे किंवा सकाळी सुरू होतात.

हा वेळ जितकी उशिरा होते. तितके जमिनीवरून येणाऱ्या वाऱ्यांच्या वेग वाढतो. त्यामुळे तापमानात वाढ होते. आजही समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याची वेळ दुपारी दोन नंतरची होती. हेच आजच्या तापमान वाढीला कारणीभूत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stray Dogs: भटक्या कुत्र्यांबाबत मार्गदर्शक तत्त्‍वे फलकावर लावा, शिक्षण संस्‍थांना निर्देश; परिपत्रक जारी

Vande Bharat Express: 'वंदे भारत' एक्सप्रेस कोझिकोडपर्यंत हवी, खासदार सदानंद शेट तानावडे यांची राज्यसभेत मागणी

Yashasvi Jaiswal Hospitalized: यशस्वी जयस्वालची प्रकृती अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल

Goa University Election: विद्यापीठ निवडणूक अचानक रद्द, 15 मिनिटे आधी पत्रक; अभाविप ,एनएसयूआयकडून धरणे आंदोलन

Horoscope: बुधवारी तुमच्या राशीत काय? मेष-मिथुनला पार्टनरकडून खास भेट, कर्कचे जुने टेन्शन दूर होणार

SCROLL FOR NEXT